शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कॅ न्टीनच्या भिंतीवरील चित्रांत कसली अभिव्यक्ती? एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांमध्येच फूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 02:37 IST

फिल्म अँंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) मधील दोन विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांमुळे पुन्हा एकदा संस्थेमधील वातावरण अशांत बनले आहे. मात्र, याच अभिव्यक्तीच्या कृतीवरून विद्यार्थ्यांमध्येच फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पुणे  - फिल्म अँंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) मधील दोन विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांमुळे पुन्हा एकदा संस्थेमधील वातावरण अशांत बनले आहे. मात्र, याच अभिव्यक्तीच्या कृतीवरून विद्यार्थ्यांमध्येच फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. प्रशासनाने विद्यार्थ्यांवर केलेली कारवाई ही अभिव्यक्तीवर हल्ला असल्याचे काही विद्यार्थी सांगत आहेत, तर दुसरीकडे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कॅन्टीनच्या भिंती तसेच दरवाजावर चित्र काढण्याला अभिव्यक्ती म्हणता येणार नाही. तुमची अभिव्यक्ती ही तुम्ही तयार करणाºया फिल्म्समध्ये दाखवा, असे परखड मत व्यक्त करीत त्या दोन विद्यार्थ्यांची कृती ही चुकीची असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.एफटीआयआयचे कॅन्टीन नूतनीकरणासाठी काही दिवस बंद होते. नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी त्याचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन झाल्यानंतर एका दिवसातच संस्थेतील दोन विद्यार्थ्यांनी कँन्टीनच्या भिंतीवर तसेच दरवाजावर चित्रे काढली. या चित्रांमध्ये एका चित्रात कवी फैज अहमद फैज यांच्या कवितेच्या हम देखेंगे या ओळी लिहिण्यात आल्या आहेत. रात्रीच्या वेळी हेतुपुरस्पर दहशत पसरविण्याच्या हेतूने ही चित्रे काढली असल्याचे एफटीआयआयचे संचालकाचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे सुरक्षारक्षकांनी हटकल्यानंतरही विद्यार्थ्यांनी ही चित्रे काढली. नूतनीकरण केलेल्या कॅन्टीनचे उद्घाटन होऊन एकच दिवस झाला होता, तोच दोन विद्यार्थ्यांनी कँन्टीनच्या भिंतीवर तसेच दरवाजावर चित्रे काढून कँन्टीन विद्रूप केल्यामुळे संस्थेच्या कुलसचिवांनी विद्यार्थ्यांना वसतिगृह रिकामे करण्याची नोटीस पाठविली. मात्र, विद्यार्थ्यांना समज देऊनही नोटीस मागे घेतल्याचे कळते. दोन वर्षांपूर्वी एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीवरून विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे शस्त्र उगारले होते. तब्बल सहा महिने हे आंदोलन विद्यार्थ्यांनी चिघळत ठेवले. मात्र, शासनाने विद्यार्थ्यांना वेसण घालण्यासाठी ज्या ज्या गोष्टींचा अवलंब केला. त्यातून काही विद्याथर््यांनी चांगलाच धसकाघेतला आहे.दोन विद्यार्थ्यांनी नूतनीकरण केलेल्या कँन्टीनच्या भिंतीवर तसेच दरवाजावर चित्र व घोषणा लिहून कँन्टीन विद्रूप केले आहे. रात्रीच्या वेळेस हे काम केले असून, एफटीआयआयच्या सुरक्षारक्षकांनी हटकल्यानंतरही विद्यार्थी थांबले नाहीत. नूतनीकरण केलेल्या कँन्टीनचे उद्घाटन होऊन एक दिवस झाला होता तोच विद्यार्थ्यांनी ते विद्रूप केल्याने ते कदापि स्वीकारण्यासारखे नाही. एफटीआयआयच्या माजी विद्यार्थ्यांनी नूतनीकरण केलेल्या कॅन्टीनचे कौतुक केले होते. त्यांनी या विद्यार्थ्यांच्या कृत्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच अनेक विद्यार्थी तसेच शिक्षकांनीदेखील या कृत्याचा निषेध केला आहे. - भूपेंद्र कँथोला, संचालक, एफटीआयआय

टॅग्स :PuneपुणेFTIIएफटीआयआय