शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

खेड तालुक्याचा पश्चिम भाग पर्यटकांनी बहरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 01:27 IST

संततधार पावसाने निसर्ग बहरला; दऱ्याखोऱ्यातून कोसळणारे धबधबे घालताहेत साद

चासकमान : खेड तालुक्याचा पश्चिम भाग निसर्गसौंदर्याने खुलला आहे. हे सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करत असल्याने हे सौंदर्य पाहण्यासाठी इतर राज्यातून पर्यटक खेड तालुक्यात येत आहेत. यामुळे खेड तालुक्याचा पश्चिम भागातील भोरगिरी परिसरातील भोरगड, लेणी, गडावरील टाके, बाराही महिने कपारीमध्ये पाण्यात असलेले महालक्ष्मी मंदिर, महादेव मंदिर ही ठिकाणे पर्यटकांनी बहरली आहे.खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील, आव्हाट, मंदोशी, शिरगाव, चिखलगाव आदी ठिकाणी पावसाने दमदार हजेरी गेल्या काही दिवसांपासून लावली आहे. यामुळे येथील डोंगरदºयातून धबधबे कोसळत आहेत. हे पाणी, चासकमान धरण, कळमोडी धरणाला मिळत असल्याने धरणांचे अफाट पाणलोट क्षेत्र, भिवेगावच्या डोंगरावरून कोसळणारा धबधबा पर्यटकांना मोहित करून टाकत आहे. पाबे गावच्या उंच डोंगरावरून कोसळणारा धबधबा व मंदिर, भोरगिरी, डेहेणे, वेळवळी, भीमाशंकर परिसरातील सह्याद्रीच्या डोंगररांगावर व्यापलेला निसर्गरम्य परिसर, दाट धुके, दाट वृक्षाची वर्दळ, तुडुंब भरलेली भातखाचरे, चासकमान धरण जलाशय पाहण्यासाठी प्रामुख्याने पर्यटक या परिसरात येत आहेत.राज्यभरातून पर्यटकांची गर्दीशिरगाव येथील नेकलेस उंच धबधबा पर्यटकांची अद्भूत निसर्गरम्य मने जिंकत असतो. या मुळे खेड तालुक्याच्या पश्चिम भागात धार्मिक, भौगोलिक, कृषीबरोबरच निसर्गाचा पर्यटनाचा पावसाळ्यातील निसर्ग पाहण्यासाठी काही वर्षीपासून पावसाळ्यात आवर्जून पर्यटनाचा खरा अनुभव घेण्यासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यांतून पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.भोरगिरी परिसरातील क्षेत्र भीमाशंकर देवस्थान असलेल्या देवभूमीला निसर्गाने आपल्या खजिन्यातून अप्रतिम सौंदर्याचं दान भरभरून दिलेलं आहे. महाबळेश्वरसारख्या निसर्गाच्या या निरलस सुंदरतेचा अनुभव ठायी ठायी अनुभवण्यासाठी खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील चिखलगाव सारख्या गावांना पर्यटक आवर्जून भेट घ्यायला विसरत नाही.

टॅग्स :Puneपुणे