शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

Pune Crime: रिव्ह्यू देऊन घरबसल्या पैसे मिळवायला गेला अन् लाखो रुपये गमावून बसला

By भाग्यश्री गिलडा | Published: July 24, 2023 4:45 PM

काही प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तीला सायबर भामट्याने दिलेले ऑनलाईन लाईक,सबस्काईबचे टास्क पूर्ण केल्यानंतर कामाचे पैसे पाठविले...

पुणे : ऑनलाईन रिव्ह्यू देऊन पैसे मिळतील असे आमिष दाखवून वारजे परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. घर बसल्या पैसे कमावण्याच्या आमिषाला बळी पडून फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन सुरेश जाधव (वय ३०, रा. वारजे) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे जाधव यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून ‘तुम्ही फक्त आम्ही दिलेल्या लिंकवर रिव्ह्यू देऊन सांगितलेले टास्क पूर्ण करा. तुम्हाला घर बसल्या पैसे मिळतील.” असा मेसेज आला.

जाधव यांनी होकार दिल्यावर सुरुवातील त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांनतर प्रीपेड टास्क आणि व्हीआयपी टास्क अशी वेगवेगळी करणे सांगून पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले. मात्र एकूण ४ लाख ४७ हजार रुपये भरून सुद्धा काही काळानंतर परतावा मिळणे बंद झाल्याने जाधव यांनी विचारणा केली. त्यावेळी कोणताही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक कुलकर्णी पुढील तपास करत आहेत. 

गुंतवणुकीचे आमिष-काही प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तीला सायबर भामट्याने दिलेले ऑनलाईन लाईक,सबस्काईबचे टास्क पूर्ण केल्यानंतर कामाचे पैसे पाठविले. तसेच याच कंपनीत पैसे गुंतवले तर पैसे चारपट परत मिळतील असे अमिष ददाखवून लोकांची फसवणूक करण्याचा फंडा सायबर चोरटे राबवत आहेत. कामाचे पैसे परत मिळत असल्याने आपल्याला मोठा फायदा होईल, या आशेने अनेक जण या फसव्या मोहात गुंतवणूक करतात. मात्र, एकदा पैसे मिळाले की सायबर भामटे थेट त्या व्यक्तीचे अकाऊंट ब्लॉक करून पसार होतात.

अशी घ्या काळजी...

  • अनओळखी नंबरवरून आलेल्या मेसेजला रिप्लाय करू नका. 
  • घरबसल्या फक्त रिव्ह्यू देऊन किंवा लाईक, सब्सक्राईब करून पैसे मिळत नसतात त्यामुळे अशा मेसेजकडे दुर्लक्ष करा. 
  • कोणत्याही ठिकाणी पैश्यांची गुंतवणूक करताना त्याची शहानिशा करणे गरजेचे आहे.
टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी