शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानबा तुकाराम अन् विठूनामाच्या जयघोषाने बारामती दुमदुमली; तुकोबांचे शहरात उत्साहात स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 18:55 IST

आभाळभरुन पाऊस पडू दे , रान शिवार फुलू दे भाविकांचे विठूरायाला साकडे

बारामती : कविवर्य मोरोपंतांच्या बारामती नगरीत मंगळवारी(दि २८) सायंकाळी संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबारायांचा पालखी सोहळा मुक्कामी विसावला.  यावेळी भजन किर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांमुळे पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी अवघी बारामती भक्तीरसामध्ये न्हाउन निघाली. दोन वर्षानंतर आलेल्या वैष्णवांचे बारामतीकरांनी उत्साहात स्वागत केले.

ज्ञानबा तुकाराम आणि विठुनामाच्या जयघोषाने आज कवि मोरोपंतांची बारामती नगरी दुमदुमली. आभाळभरुन पाऊस पडू दे ,रान शिवार फुलू दे’ माझ्या शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळु दे, अशी मनात आस ठेवत हे वारकरी भाविकांनी आपल्या भोळ्या भक्तीने विठूरायाला साकडे घातले. शहराच्या वेशीवर श्री तुकोबांच्या पालखीचे बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे,  उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, मुख्याधिकारी महेश रोकडे, पोलीस निरीक्षक महेश ढवाण आदी पदाधिकारी अधिकाऱ्यांनी उत्साहात स्वागत केले.

नगरपालिकेच्या वतीने स्वागत कक्षात पालखीचे स्वागत करण्यात आले. शहरातील शारदा प्रांगणात उभारण्यात आलेल्या शामियानात पालखी सोहळा सायंकाळी विसावला. यावेळी बारामती शहरातील भाविक मोठ्या प्रमाणात आरतीसाठी उपस्थित होते. बारामती शहरातील विविध तरुण मंडळांनी अन्नदानाचा उपक्रम राबविला. तसेच चहा,फळेवाटप सह पाण्याच्या बाटल्यांचे वाटप यावेळी करण्यात आले. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी हुतात्मा स्तंभावर केलेली फुलांची सजावट आणि येथे उभारलेली विठोबाची प्रतिमा सेल्फी पॉईंट ठरली. दरम्यान बुधवारी(दि २९) सकाळी पालखी सोहळा सणसर (ता.इंदापुर) मुक्कामासाठी प्रस्थान ठेवणार आहे. तत्पुर्वी काटेवाडी येथे पालखी सोहळ्यातील वैशिष्ठ्यपुर्ण मेंढ्यांचे रिंगण पार पडेल.

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Baramatiबारामतीsant tukaram palkhiसंत तुकाराम पालखीAshadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpurपंढरपूर