शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

स्वागताने कॅनडाचे पाहुणे भारावले

By admin | Updated: January 20, 2015 23:44 IST

कॅनडातील पाहुणे आणि स्वागताला मराठमोळा साज! भारावून गेले. पेरणेगाव आणि आबालवृद्धांनी केली गर्दी. आगळावेगळा सुवर्णदिवस आज.

लोणी कंद : कॅनडातील पाहुणे आणि स्वागताला मराठमोळा साज! भारावून गेले. पेरणेगाव आणि आबालवृद्धांनी केली गर्दी. आगळावेगळा सुवर्णदिवस आज. पेरणेगाव (ता. हवेली) येथे रोटरी क्लब आॅफ पुणे कॅन्टोंमेंट व स्लिपिंग चिल्ड्रन अराऊंड द वर्ल्ड (कॅनडा) यांच्या विद्यमाने ८०० विद्यार्थ्यांना चटईपासून दप्तरपर्यंत शालेय वस्तूंचे किटवाटप करण्यात आले. यासाठी समीर रुपानी, खुजेम, राजेश जैन, रुपानी अकपा, मारी रेड्डी, सुजाता आपटे हे कॅनडातील पाहुणे पेरणे गावात आले होते. गावचा परिसर स्वच्छ करुन घरांपुढे रांगोळी घालण्यात आली होती. ढोल लेझीम ठेका, मराठमोळे फेटे आणि पाहुण्यांसाठी खास सजवलेली बैलगाडी. या आगळ्यावेगळ्या स्वागताने पाहुणेही भारावून गेले. प्रथम भारतीय नंतर कॅनडाच्या राष्ट्रगीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला. सतरंजी, गादी, उशी, ब्लँकेट, शाळेचे ड्रेस, नाईट ड्रेस, स्वेटर, कानटोपी, रेनकोट, बूट सॉक्स, ड्रॉर्इंगवही, रंगपेटी, नोटबुक, पाण्याची बाटली अशा ३५ वस्तूंचे किट या वेळी देण्यात आले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, पंचायत समिती सभापती वसुंधरा उबाळे, संदीप भोंडवे, ज्ञानेश्वर वाळके, अशोक खांदवे, सुभाष जगताप, आत्माराम वाळके, सरपंच सुनीता लोंढे, उपसरपंच राजेंद्र वाघमारे, दत्तात्रय वाळके, नीलेश वाळके, रवींद्र वाळके, संदीप कोहिनकर, मीना शेंडकर, कौस्तुभ गायकवाड, युसूफ बंगाली, पंकज आपटे, करण मार्गेन, अ‍ॅलोयसिस परेश आदींनी त्यांचे स्वागत केले. पेरणेगाव परिसरातील शाळांना लवकरच संगणक देण्यात येतील, असेही वांजळे यांनी सांगितले. ग्रामपंचायत सदस्य नीलेश गव्हाणे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन झाले. शिवाजी वाळके, संतोष वाळके यांनी स्वागत केले. वैभव पोरे यांनी सूत्रसंचालन केले. रोहिणी दरेकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)‘‘पाहुण्यांनी हवेली तालुक्यातील पेरणे गावची निवड केली, हे आमचे भाग्यच आहे! विद्यार्थ्यांच्या गरजा काय? अपेक्षा काय? शिक्षणासाठी आवश्यक बाबी काय? याचा कधी पालकांनी विचार केला नसेल. परंतु पाहुण्यांनी केला आहे. त्यांना असे साहित्य आणि योग्य मार्गदर्शन मिळालं तर ते नेत्रदीपक कामगिरी करून दाखवतील. - शुक्राचार्य वांजळे