शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Weather Alert: पुढील २४ तासांसाठी रायगडला 'रेड' अलर्ट तर मुंबईसह संपूर्ण कोकणात 'येलो अलर्ट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 22:03 IST

कोकण, मुंबईला पावसाने झोडपले...

पुणे : मुंबई, ठाण्यासह कोकणातील अनेक भागात मॉन्सूने बुधवार जोरदार आगमन झाले असून पावसाने कोकणासह मुंबईला झोडपून काढले आहे. सांताक्रूझमध्ये अतिवृष्टी झाली असून सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत २२१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रायगडमध्ये गुरुवारी रेड अलर्ट दिला असून संपूर्ण कोकणात पुढील चार दिवस येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचवेळी पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात १२ व १३ जून रोजी येलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यातील घाट परिसरात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

कोकणात मंगळवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला असून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. बुधवारी सकाळपर्यंत बेलापूर, कणकवली, पनवेल, रत्नागिरी येथे ११०, श्रीवर्धन १००, अलिबाग, मुंबई ८०, भिवंडी, गुहागर, हर्णे, मार्मागोवा, मुरुड ७० मिमी पावसाची नोंद झाली होती. याशिवाय बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे.

मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वर, ओझरखेडा ३०, मुक्ताईनगर २० मिमी पाऊस झाला. मराठवाड्यातील काही ठिकाणी हलका पाऊस झाला. विदर्भातील अकोला ७०, जिवंती ५०, अंजनगाव, चिखलदरा, चिखली, दारव्हा, मानोरा ४० मिमी पावसाची नोंद झाली होती. तसेच अनेक ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची नोंद झाली आहे. 

घाट माथ्यावरील डुंगरवाडी ९०, ताम्हिणी, भिरा ८०, धारावी ७०, दावडी, कोयना (नवजा) ५०, कोयना (पोफळी) ४०, लोणावळा, शिरगाव ३० मिमी पाऊस झाला आहे. 

सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मुंबई व कोकणात मुसळधार पाऊस झाला. सांताक्रुझ २२१, मुंबई (कुलाबा) ४६, अलिबाग ३८, रत्नागिरी ५, डहाणु ४१, महाबळेश्वर २१, सातारा ३, अकोला १, अमरावती ३, नागपूर ४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.  

येलो अलर्ट....रायगड जिल्ह्यात गुरुवारी रेड अलर्ट दिला असून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये १० ते १३ जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यात गुरुवारी वादळी वार्‍यासह पावसाचा शक्यता आहे. तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये १० ते १३ जून दारम्यान पावसाचा इशारा दिला आहे. गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात १३ जून रोजी येलो अलर्ट देण्यात आला आहे. 

पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात ११ जून रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच १२ व १३ जून रोजी येलो अलर्ट देण्यात आला आहे. घाट परिसरातील तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे.  

पुणे शहरात हलक्या पावसाची शक्यतापुणे शहर व परिसरात आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळपर्यंत पुणे ३ व लोहगाव येथे २ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी शहरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. घाट परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ...मॉन्सूनचे विदर्भात आगमनकोकण, मुंबईबरोबरच आज विदर्भात मॉन्सूनचे आगमन झाले असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. मॉन्सूनने गुरुवारी तेलंगणाचा काही भाग, महाराष्ट्र, आंध्र प्रदेशातील आणखी काही भाग, बंगालच्या उपसागरातील मध्य व उत्तर भागातील बहुतांश भागात प्रवेश केला आहे. बालसर, मालेगाव, नागपूर, भद्राचलम, तुरी अशी मॉन्सूनची सीमारेषा आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसMonsoon Specialमानसून स्पेशलMumbaiमुंबईRaigadरायगड