शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

HighCourt: हिजाब घालणे धर्मस्वातंत्र्याचा भाग नाही, अ‍ॅड. असीम सरोदेंनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 17:25 IST

हिजाब हा विषय आता सर्वोच्च न्यायालयात नक्की जाईल आणि तो सर्वोच्च न्यायालयात जावा अशी कट्टरवादी मुस्लिम राजकारण करणाऱ्यांची जशी इच्छा आहे तशीच इच्छा कट्टरवादी हिंदुत्व मिरवणाऱ्यांची आहे.

पुणे - कर्नाटकउच्च न्यायालयाने हिजाब प्रकरणी आपला निकाल दिला असून हिजाब हा इस्लामचा आवश्यक भाग नसल्याचे आपल्या निकालात म्हटले आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार, आता शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्यास बंदी असेल. कर्नाटकउच्च न्यायालयाच्या निर्णयाचं कुठे स्वागत तर कुठे विरोध केला जात आहे. AIMIM प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी जाहीर केली आहे. तर, पुण्यातील नामवंत विधिज्ञ अ‍ॅड. असीम सरोदे यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. 

हिजाब हा विषय आता सर्वोच्च न्यायालयात नक्की जाईल आणि तो सर्वोच्च न्यायालयात जावा अशी कट्टरवादी मुस्लिम राजकारण करणाऱ्यांची जशी इच्छा आहे तशीच इच्छा कट्टरवादी हिंदुत्व मिरवणाऱ्यांची आहे. सामान्य नागरिकांनी या दोन्ही प्रवृतींपासून दोन हात लांब राहावे. घटनेतील कलम 25 नुसार असलेला धार्मिक स्वातंत्र्य हा व्यक्तिगत स्वातंत्र्याचा भाग आहे. आपला-आपला धर्म घरात पाळावा या पायरीपर्यंत जाण्यासाठी आपल्याला मोठा पल्ला गाठायचा आहे, हे सतत लक्षात ठेवावे लागेल. 

हिजाब घालणे धर्मस्वातंत्र्याचा भाग नाही

हिजाब धार्मिक स्वातंत्र्याचा भाग नाही या निर्णयाने आपण संवैधानिक होण्याची एक पायरी चढलो आहे. आपला संविधानिक होण्याचा प्रवास सुरु राहीला तर आपण हे नक्की समजून घेतले पाहिजे की कोणत्याही देवाच्या मूर्ती, पूजा, आरत्या शाळा, कॉलेजमध्ये होणे हा सुद्धा धार्मिक स्वातंत्र्याचा भाग नाही. हिजाब बंदी योग्य आहे. शाळा कॉलेज मध्ये हिजाब घालण्याची परवानगी नाकारली जाणे योग्य आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने अत्यंत महत्वाचा निर्णय दिला आहे, त्याचे स्वागत केले पाहिजे. हिजाब घालणे हा धर्म स्वातंत्र्याचा भाग नाही हे संविधानिक सत्य आता आपण सगळ्यांनी स्विकारले पाहिजे, असे असीम सरोदे यांनी म्हटलं आहे. 

हायकोर्टाचा निर्णय अमान्य - औवेसी

हिजाब प्रकरणी उच्च न्यायालयाचा निर्णय आम्हाला आदरपूर्वक अमान्य आहे. राज्यघटनेनं दिलेल्या फ्रीडम ऑफ रिलीजन, फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ फ्रीडम ऑफ कल्चर या मुलभूत हक्कांवर गदा आणली जात आहे. शाळेत, कॉलेजमध्ये युनिफॉर्म घातल्यानंतरही विद्यार्थ्यांची जात, वर्गवार ओळख होतेच. कोण गरीब कोण श्रीमंत, कोण दलित, कोण मुस्लीम, कोण ठाकूर ही ओळख लपून राहते का? असा सवाल असदु्दीन औवेसींनी केला आहे. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकHigh Courtउच्च न्यायालयMumbaiमुंबईPuneपुणे