शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Chandrakant Patil: पत्रकारांच्या घरांसाठी प्रयत्न करू - चंद्रकांत पाटील यांचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 06:31 IST

Chandrakant Patil: पत्रकारांच्या आयुष्यात स्थिरता कशी आणता येईल, त्यावर काम करायला हवे. पत्रकारांना घरे द्यायला हवीत, असे मत उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

पुणे : पत्रकारांच्या आयुष्यात स्थिरता कशी आणता येईल, त्यावर काम करायला हवे. पत्रकारांना घरे द्यायला हवीत. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी तरतूद हवी. तसेच पत्रकारांची गुणवत्ता वाढविण्यासाठी त्यांनाही एखादी फेलोशिप देऊन परदेशातील शिक्षण पाहण्याची संधी देता येईल का? यावर काम करायला हवे, असे मत उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुरुवारी पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर होते. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे, ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, सुनील माळी उपस्थित होते.असोसिएशनच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल किरण जोशी यांचाही सत्कार झाला. पुणे शहराध्यक्षपदी पंकज बिबवे, सांस्कृतिक विभागपदी संदीप भटेवरा, प्रसिद्धीप्रमुखपदी निवडलेल्या सागर बोधगीर यांचाही सत्कार झाला.पाटील म्हणाले, पत्रकारिता हे मिशन आहे. त्यासाठी मेहनत घेणे आवश्यक आहे. नवख्या पत्रकारांना शिक्षण देण्यासाठी पुणे किंवा मुंबई येथे सेंटर सुरू करता येईल का? याविषयी काही करायला हवे. पत्रकारितेच्या कार्यशाळा हव्यात, त्यासाठी मी प्रयत्न करेन.बाविस्कर म्हणाले, चंद्रकांतदादा हे अतिशय संयमी, सुसंस्कृत आहेत. विद्यार्थी परिषदेपासून आम्ही ओळखतो. ते सर्वांमध्ये जाऊन काम करणारे आहेत. ते कोल्हापूरचे आहेत की पुण्याचे? हा वाद न घालता ते माणूस म्हणून चांगले आहेत आणि तेच महत्त्वाचे असते.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलJournalistपत्रकार