शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही फटाके फोडणार नाहीत; विद्यार्थ्यांनी घेतली प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 12:34 IST

प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्याच्या हेतूने वारजे परिसरातील ४ शाळांनी पुढाकार घेतला असून पर्यावरणपुरक दिवाळी साजरी करण्याची विद्यार्थ्यांनी शपथ घेतली.

ठळक मुद्देप्रदुषणास आळा बसण्याच्या हेतूने हे अभियान राबविले जात आहे. काही शाळा मागील काही वर्षापासून दर वर्षी दिवाळीला संकल्प अभियान राबवीत आहेत.

वारजे : प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान २०१७ अंतर्गत वारजे परिसरातील चार शाळांच्या विद्यार्थ्यांनी एकत्र जमत प्रदुषणमुक्त दिवाळी साजरे करणार असल्याची शपथ घेतली. यंदा प्रदूषणमुक्त व पर्यावरणपुरक दिवाळी साजरी करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला असून त्यास प्रतिसाद देत या चार शाळांनी या उपक्रमाची आखणी केली. अतुलनगर येथे झालेल्या या कार्यक्रमात मामासाहेब मोहोळ विद्यालय, स्मिता पाटील विद्यालय, मॉडर्न संकुलाचे पंडित जवाहरलाल नेहरू शाळा व यशोदीप माध्यमिक विद्यालय या चार शाळेचे हजारो विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले होते. मनपा स्वीकृत सदस्य सचिन दांगट यांनी या अभियानाचे आयोजन केले होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाहक चित्तरंजन भागवत, माजी नगरसेवक किरण बारटक्के, सहायक पोलीस निरीक्षक सलीम नदाफ, सर्व शाळेचे शिक्षक व मुख्याध्यापक तसेच नागरीकही उपस्थित होते. यावेळी दांगट म्हणाले, की दिवाळीत दर वर्षी हवेचे प्रदूषण वाढतच आहे. ही बाब आरोग्यासाठी हितावह नसून प्रदुषणास आळा बसण्याच्या हेतूने हे अभियान राबविले जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, यापैकी काही शाळा मागील काही वर्षापासून दर वर्षी दिवाळीला संकल्प अभियान राबवीत आहेत. यावेळी मामासाहेब मोहोळ विद्यालयाचे किरण सूर्यवंशी, सुनंदा पवार संभाजी चौगुले, आनंदा दराडे, स्मिता पाटील शाळेचे संतोष तनपुरे, वैशाली चव्हाण, वैशाली खरात, मॉडर्न शाळेच्या अंजली पाठक संदीप तीरकुंडे, यशोदीप शाळेचे मंगला जावळे, नीता मुंजीकर, व्यंकटेश देशमुख, भाऊसाहेब शिंगाडे, वैशाली शिंपी, लक्ष्मण मुळे, सारिका कांबळे, योगिता फाळके, कपिल देशमुख आदी शिक्षकांनी सहभाग नोंदवत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याशिवाय ज्ञानेश्वर ठाकर, वंदना नवघरे, मानसी कुलकर्णी, विनायक लांबे, शकील शेख आदी उपस्थित होते. 

टॅग्स :diwaliदिवाळीStudentविद्यार्थीPuneपुणे