शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

Pahalgam Terror Attack: हल्ल्याच्या ठिकाणापासून आम्ही ७ किलोमीटरवर; चालकाने जागेवरच थांबायला सांगितले, पुण्याच्या पर्यटकाची हकीकत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 18:07 IST

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमच्या दुसऱ्या ग्रुपमधील चार चाकी चालकाने लगेचच गाडी एका हॉटेलमध्ये घालून स्वतः व गाडीतील पर्यटकांना सुरक्षित स्थळी थांबवले

उरुळी कांचन(पुणे) : घटना घडली त्या ठिकाणापासून अलीकडे ७ किलोमीटर अंतरावर आम्ही होतो. आमच्या ग्रुप मधील एका इनोव्हा चार चाकी चालकाने प्रसंगावधान राखून फोन करून आम्हास जागेवर थांबायला सांगितले. अशी माहिती पर्यटनासाठी गेलेल्या समशेर शेख यांनी दिली. उरुळी कांचन ता.हवेली जि. पुणे येथील पहलगाम पर्यटनासाठी गेलेले समशेर शेख व त्यांची पत्नी शाईन, मुलगा सिद्दिक हे श्रीनगर येथील एका हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत. मागील पाच दिवसांपूर्वी ज्योती झुरुंगे या महिलेने एकूण ७० नागरिक पर्यटनासाठी सर्व व्यवस्थापन करून नेले होते. सर्वजण रेल्वेने जाऊन तेथील पर्यटन स्थळ पाहण्यासाठी तेथील स्थानिक चार चाकी वाहनाने पर्यटन स्थळ पाहत होते. २५ तारखेला त्यांचे रेल्वेची परतीची तिकिटे आरक्षित होती.

 समशेर शेख यांनी सांगितलेली कहाणी अशी की, ७० पर्यटक हे शिरूर दौंड हवेली अशा तालुक्यातून गेलेले होते. ग्रुप करून चार चाकी वाहनामध्ये पर्यटन स्थळ पाहायला जात असताना दहशवादी हल्ला झाल्याची घटना घडली. त्या ठिकाणापासून सात किलोमीटर अलीकडे अंतरावर होती. व त्यांच्याच ग्रुप मधील एक गाडी घटनेच्या एक किलोमीटर अंतरावर पोहोचली होती. दुसऱ्या गाडीच्या चालकाने जेव्हा घटना घडली त्या ठिकाणापासून लोकांचे धावपळ, व चार चाकी गाड्या थांबल्याचा अंदाज आला. दुसऱ्या गाडीच्या शेजारी थांबलेल्या एका गाडीतील ड्रायव्हरने लगेचच खुणावले व परत फिरण्यास सांगितले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमच्या दुसऱ्या ग्रुपमधील चार चाकी चालकाने लगेचच गाडी एका हॉटेलमध्ये घालून स्वतः व गाडीतील पर्यटकांना सुरक्षित स्थळी थांबवले. व लगेचच आम्ही असलेल्या चार चाकी गाडीतील चालकाला फोन करून सांगितले की, पुढे येऊ नका या ठिकाणी दहशतवादी हल्ला झालेला आहे.

आम्ही लगेचच गाडी जागेवर थांबवली. त्यानंतर भारतीय सैन्य दलाने सर्व गाड्या हॉटेल्स वरती सुरक्षित पाठवल्या. आमच्या पुढच्या ग्रुपमधील वाहनचालकाने लगेचच फोन करून सांगितल्यामुळे आम्ही बचावलो व पुढील अनर्थ टळला. माझे माझ्या घरच्यांशी संपर्क चालू आहे. आम्ही सुरक्षित आहोत. मला माझे वडील अब्दुल गफूर व आई सलीमा शेख यांनी संपर्क केला. आमचे बोलणे झाल्यानंतर ते सर्व चिंतामुक्त झाले.

माझा भाऊ समशेर शेख व त्याची पत्नी व मुलासह रेल्वेने ५ दिवसापूर्वी पर्यटनासाठी गेले होते. परंतु घटना घडली त्या दिवशी बातम्यांमधून मधून जेव्हा ही घटना समजली तेव्हा मी व माझे आई-वडील आम्ही चिंताग्रस्त झालो होतो. आम्ही लगेचच भाऊ समशेर याला फोन केला व तो आमच्याशी बोलला आम्ही सुरक्षित आहोत, आम्हाला कुठल्याही प्रकारचा धोका नाही, भारतीय सैन्य दलाने सर्व गाड्या हॉटेल्स वरती पाठवून दिले आहेत व आम्ही लवकरच घरी येऊ. आई वडील त्यांच्याशी बोलले व आम्ही सर्व चिंतामुक्त झाले.-  युनुस शेख, पर्यटक समशेर शेख यांचा भाऊ

टॅग्स :PuneपुणेPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाuruli kanchanउरुळी कांचनJammu Kashmirजम्मू-काश्मीरhotelहॉटेल