शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याची लोकसभेची जागा आमचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 03:53 IST

काँग्रेसचा दावा : जिंकून आणण्याची घेतली शपथ

पुणे : कोणी कितीही हक्क सांगत असले तरी लोकसभेची पुण्याची जागा ही काँग्रेसचीच परंपरागत जागा आहे. त्यामुळे ती सोडण्याचा प्रश्नच नाही, उलट ती जिंकून आणण्याची शपथ पक्षाच्या सर्व नेत्यांनी एकजुटीने घेतली आहे, असे शुक्रवारी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ठासून सांगितले.केंद्रातील मोदी सरकारच्या ४ वर्षांच्या कारकिर्दीच्या निषेधार्थ पक्षाच्या वतीने येत्या सोमवारी (दि. २८) काढण्यात येणाºया मूकमोर्चाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकारांच्या बैठकीत सर्वच नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे लोकसभा मतदारसंघावर केलेल्या दाव्याची त्यांचे नाव न घेता खिल्ली उडवली. आघाडी होवो अथवा न होवो पुण्याची जागा काँग्रेसच लढवणार आहे, असे त्यांनी सांगितले.शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती चवधरी, पक्षाच्या प्रदेश समितीचे सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड, महिला काँग्रेसच्या अखिल भारतीय सरचिटणीस कमल व्यवहारे, नगरसेवक अविनाश बागवे, लता राजगुरू, संगीता तिवारी, नीता रजपूत, माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, कामगार संघटनेचे सुनील शिंदे, शहर सरचिटणीस रमेश अय्यर, पक्षाच्या ओबीसी आघाडीचे अध्यक्ष सुनील पंडित आदी यावेळी उपस्थित होते.लोकसभेचा पुणे मतदार संघ हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ आहे. तो आम्ही घटक पक्षाला देऊ शकत नाही. आमच्याकडे सक्षम उमेदवारांची वाणवा नाही. पक्ष देईल तो उमेदवार मान्य करू. गटबाजीचा काय त्रास होतो, त्याचा अनुभव पक्षाला आता आला आहे. त्यामुळेच गटबाजी विसरून हा मतदारसंघ परत काबीज करायचाच, अशी शपथच नेते मंडळींनी एकत्रितपणे घेतली आहे, असे शिवरकर म्हणाले.मोहन जोशी यांनी यावेळी भाजपाला धार्मिक दंगे घडवून आणण्याशिवाय दुसरे काही सुचत नाही व येतही नाही, अशी टीका केली. मूकमोर्चा सोमवारी सकाळी साडेदहा वाजता मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सुरू होईल व स्वारगेट येथील केशवराव जेधे पुतळ्याजवळ विसर्जित होईल, अशी माहिती यावेळी बागवे, छाजेड, जोशी यांनी दिली.

टॅग्स :Puneपुणे