शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

“आम्ही उदयनराजेंच्या पाठिशी आहोत, छत्रपतींचे वंशज कधीच हतबल होऊ शकत नाहीत”

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 22:48 IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. राज्यपालांवरही केलं भाष्य.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यभरात निषेध व्यक्त केला जात आहे. सोमवारी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन आक्रमक भूमिका घेतली. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठिशी आम्ही कायम असल्याचं फडणवीस म्हणाले. तर त्यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहोचवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. पुण्यात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी यावर वक्तव्य केलं.

“खासदार उयनराजे भोसले यांच्या पाठिशी भाजप कायम आहे. छत्रपतींचे वंशज कधीच हतबल होऊ शकत नाहीत. तरी त्या ठिकाणी ते भावनेने बोलले असले तरी महाराष्ट्र आणि देश त्यांच्या पाठिशी आहेत. त्यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहोचवल्या आहेत. राज्यपाल हे संवैधानिक पद आहे. त्यात सरकार हस्तक्षेप करू शकत नाही. राज्यपालांना नियुक्त करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना असतात. त्यांच्या भावनेच्या पाठिशी आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरे कोणी प्रेरणास्त्रोत कोणी असूच शकत नाहीत,” असं फडणवीस यावेळी म्हणाले.

काय म्हणाले होते उदयनराजे भोसले?"आज राज्यातील शिवप्रेमींशी चर्चा केली, सर्वांनी मुद्दे मांडले. महाराजांचे चित्रपटातून अवहेलना केली जाते, तेव्हा राग कसा येत नाही? तुम्ही महाराजांचे राजकारणासाठी नाव का घेता, असा सवाल खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केला. लोकशाहीचा ढाचा महाराजांनी मांडला. जे महाराजांवर चुकीच बोलतात त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा का होत नाही, असंही खासदार भोसले म्हणाले. 

"महाराजांनी सर्वांना एकत्र आणले होते, सगळ्या जातींना एकत्र राहण्यास शिकवले होते. महाराजांबद्दल सध्या होत असलेल्या राजकारणामुळे लोक चिडले आहेत. त्यामुळे ३ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता रायगडावर जाऊन प्रतिकात्मक आक्रोश व्यक्त करणार" असल्याचे खासदार उदयनराजे भासले म्हणाले.  "राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची मी या संदर्भात भेट घेणार आहे. त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे. त्यांनी कारवाई केली नाही तरीही मी माझी भूमिका बदलणार नाही, असंही खासदार उदयनराजे भोसले म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी