शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही शिवछत्रपतींचे मावळेच - देवेंद्र फडणवीस; जागतिक वारशासाठी १२ किल्ल्यांचे युनेस्कोला सादरीकरण

By राजू इनामदार | Updated: February 19, 2025 16:49 IST

महाराजा प्रतिष्ठान संचलित आंबेगाव पठार येथील शिवसृष्टीस ५० कोटी रूपयांचा निधी जाहीर

पुणे: मी स्वतः व माझे दोन्ही उपमुख्यमंत्री शिवछत्रपतींचे मावळेच आहोत, काहीही मदत लागली तर आम्ही आहोतच असे आश्वासन देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी महाराजा प्रतिष्ठान संचलित आंबेगाव पठार येथील शिवसृष्टीस ५० कोटी रूपयांचा निधी जाहीर केला. राज्यातील १२ किल्ल्यांचा जागतिक वारसास्थळात समावेश व्हावा यासाठी लवकरच युनोस्को मध्ये सादरीकरण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान आयोजित शिवसृष्टीच्या दुसर्या टप्प्याचे लोकार्पण शिवजयंतीचे औचित्य साधून फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी दुपारी आंबेगाव पठारमध्ये झाले. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, आमदार विजय शिवतारे खासदार उदयनराजे भोसले, पश्चिम महाराष्ट्र संघचालक नानासाहेब जाधव, पुणे क्षेत्रीय संघचालक रविंद्र वंजारवाडकर, प्रतिष्ठानचे विश्वस्त विनय सहस्त्रबुद्धे व्यासपीठावर उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला, पण त्याआधीच छत्रपतींनी खऱ्या अर्थाने मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला. शिवसृष्टीला आम्ही मेगा टुरीझमचा दर्जा दिला आहे, मात्र हे पर्यटन स्थळ नव्हे. हे प्रेरणास्थळ आहे. श्रीमंत योगी असलेल्या थोर पुरूषाचे हे मंदिर आहे. इथे जे काही सुरू आहे ते काम अतिशय सुरेख आहे. शिवराय लढवय्ये होतेच, पण ते उत्तम प्रशासक होते. कोणीही कोणावर अन्याय करू शकत नव्हते कायदा व सुव्यवस्थेची स्थिती त्यांनी निर्माण केली. त्यांचे असे सगळे पैलू स्रुष्टीतून पुढे यावेत. त्यासाठी आमच्याकडून आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल.”राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक नानासाहेब जाधव यांचेही भाषण झाले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी प्रास्तविकात शिवसृष्टीची माहिती दिली. दुसऱ्या व चौथ्या टप्प्यात काय असेल ते त्यांनी सांगितले. स्वराज, स्वधर्म, स्वभाषा या महाराजांच्या त्रिसुत्रीवर आधारित ही शिवसृष्टी असेल असे ते म्हणाले. प्रतिष्ठानच्या वतीने सर्व पाहुण्याचा सत्कार करण्यात आला. विश्वस्त विनित कुबेर यांनी आभार व्यक्त केले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस