शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संविधानाच्या तत्त्वापासून आपण दूर चाललो आहोत; लक्ष्मीकांत देशमुख यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 13:32 IST

काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठानच्या वतीने लक्ष्मीकांत देशमुख यांना ‘काकासाहेब गाडगीळ साहित्य पुरस्कार’ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार अनंतराव गाडगीळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्देलेखक या नात्याने समाजासमोर वास्तवाचा आरसा ठेवला पाहिजे : लक्ष्मीकांत देशमुखलक्ष्मीकांत देशमुख यांना ‘काकासाहेब गाडगीळ साहित्य पुरस्कार’ प्रदान

पुणे : आज भारतात कुरूपता वाढत चालली आहे. असहिष्णुता, धार्मिकता याचे बंध अधिक घट्ट होत असल्याने संविधानाच्या तत्त्वापासून आपण दूर चाललो आहोत, अशी खंत ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केली. लेखक या नात्याने समाजासमोर वास्तवाचा आरसा ठेवला पाहिजे, असेही ते म्हणाले. काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठानच्या वतीने लक्ष्मीकांत देशमुख यांना ‘काकासाहेब गाडगीळ साहित्य पुरस्कार’ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार अनंतराव गाडगीळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. २१ हजार रुपये असे पुरस्कार स्वरूप आहे. याप्रसंगी प्रतिष्ठानचे विश्वस्त आर. पी. जोशी उपस्थित होते.खरा लेखक तो असतो जो दलित आणि शोषितांचा आवाज बनतो. खरा लेखक हा पुरोगामी असतो. प्रतिव्यवस्था सत्ताकेंद्री झाली की ती इतरांचे शोषण करते. याच व्यवस्थेला हादरा दिला पाहिजे. आज विज्ञानवाद, विवेकवाद आणि मानवतावाद या तिन्हींपासून आपण दूर आहोत. आपल्याला प्रश्नच पडत नाहीत. आंधळेपणाने विश्वास ठेवून सर्व गोष्टींचा स्वीकार करीत आहोत, अशा शब्दांत त्यांनी समाजव्यवस्थेवर बोट ठेवले. महिला असुरक्षितता, समान दर्जा  यापासून ते शेतकरी आत्महत्या या विषयावर त्यांनी भाष्य केले. सध्या सावित्रीची लेक विरुद्ध जोतिबाचा पुत्र असा संघर्ष सुरू आहे. स्त्रीकडे बुद्धी आणि कर्तव्य आहे, प्रतीक्षा आहे समानतेची. तिला समाजात समान स्थान देणे पुरुषवर्गाला मान्य आहे का? तर हे चित्र नक्कीच आशादायी नाही. पुरोगामी आणि सुसंस्कृततेचा वारसा पुढे नेण्यात जोतिबाचा पुत्र कमी पडला आहे, याकडे देशमुख यांनी लक्ष वेधले. 

काकासाहेब गाडगीळ काँग्रेसचे होते खरे कार्यकर्तेखरा काँग्रेसचा कार्यकर्ता कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे काकासाहेब गाडगीळ होते. साधनशुचिता आणि सामाजिक बांधिलकी ही त्यांची वैशिष्ट्ये होती. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते, त्यांच्या नावाने पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे, अशी भावना लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Laxmikant Deshmukhलक्ष्मीकांत देशमुखPuneपुणे