शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
3
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
4
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
5
IND vs WI : टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
6
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
7
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
8
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
9
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
10
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
11
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
12
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
13
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
14
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
15
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
16
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
17
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
18
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
19
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
20
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?

पुरंदरच्या दक्षिण भागात टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 01:38 IST

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा पुढाकार

नीरा : पुरंदरचा दक्षिण-पूर्व पट्टा कायम टंचाईग्रस्त म्हणून घोषित असतो. या वर्षी मात्र ऐन उन्हाळ्यात एकाही वस्तीवर टँकरची गरज भासली नव्हती. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विहिरींची पाणीपातळी खालावली. त्यामुळे शासनदरबारी हेलपाटे मारण्यापेक्षा येथील लोकांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडे तातडीने पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी केली होती. मे महिन्यापासून आजपर्यंत सलग २ टँकरने तीन गावांतील सात वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची सोय केली जात आहे.ग्रामपंचायतीच्या फक्त एका मागणीपत्रावर ट्रस्टने तातडीने वाड्या-वस्त्यांवर मागेल त्याला पाणीपुरवठा सुरू केला आहे. पुरंदर तालुक्याच्य दक्षिण-पूर्व पट्ट्यात मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने यावर्षी पिण्याच्या पाण्यासाठीची वणवण जाणवली नाही. मात्र उन्हाळ्यात ढगाळ वातावरणामुळे विहिरींची पाणीपातळी कमालीची खालावली. मे महिन्यात उन्हाळी वळवाचा एखाददुसरा पाऊस झाला असता तर पुढील काळात पिण्याचे पाणी पुरले असते. उन्हाळ्यात वळवाचा एकही पाऊस न झाल्याने पाण्याची भटकंती करावी लागली. उन्हाळ्यापासून राख गावठाण, महादेववस्ती, चव्हाणवस्ती, रणवरेवाडी, वाल्हे गावच्या पूर्वेकडील अंबाजीचीवाडी, मुकादमवाडी, गायकवाडवाडीसह वाड्या-वस्त्यांवरील, तसेच कर्नलवाडी येथील झिरपवस्ती येथे टंचाई निर्माण झाल्याने ग्रामपंचायतींनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडे टँकरची मागणी करताच एका दिवसात टँकर सुरू झाल्याने गावकऱ्यांच्या डोक्यावर हंडा घेण्याची वेळ आली नाही.श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या जय गणेश आपत्ती निवारण अभियान गणेश अमृतजल पाणीपुरवठा योजनेअंतर्गत टंचाईग्रस्त गावांसाठी तत्कालीन पाणीपुरवठा करण्यासाठी ही योजना आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे तोपर्यंत टँकरने मोफत पाणीपुरवठा केला जाईल.- महेश सूर्यवंशी, कोषाध्यक्षश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट

टॅग्स :Purandarपुरंदरwater shortageपाणीटंचाई