शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
5
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
6
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
7
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
8
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
9
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
10
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
14
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
15
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
16
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
17
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
18
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर

शंभरपेक्षा अधिक देशांमध्ये पाण्यासाठी संघर्ष : पोपटराव पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 12:36 IST

वाढते तापमान चिंताजनक

ठळक मुद्देतळेगावमधील व्याख्यानमालेत मार्गदर्शन रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस कमी होत चालला

तळेगाव दाभाडे : वाढते तापमान हे चिंताजनक आहे. पर्यावरण आणि निसर्ग संपदा जपली पाहिजे. जगात शंभरपेक्षा अधिक देश पाण्यासाठी संघर्ष करीत आहेत. पावसाचे पाणी अडविण्याचा आणि ते जिरविण्याचा उपक्रम सर्वत्र राबविला गेला पाहिजे. वनसंपदा जपली पाहिजे, तरच पर्यावरण टिकेल. पाण्याचा ताळेबंद कुणीही मांडत नाही. हिवरे बाजारमध्ये पाण्याचा ताळेबंद विद्यार्थी करतात. शासकीय निधी आणि योजनेचा पुरेपूर वापर, ग्रामस्थांची साथ आणि लोकसहभागामुळेच हिवरे बाजार गाव जगाच्या पटलावर गेले आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदर्श ग्राम कार्यक्रम निदेशक व हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेतर्फे आयोजित मावळ भूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमालेत ‘वन, मृद, पाणी : युवकांचे योगदान’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफताना पवार बोलत होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष, माजी आमदार कृष्णराव भेगडे, कार्यवाह रामदास काकडे, उपाध्यक्ष मुकुंदराव खळदे, खजिनदार चंद्रकांत शेटे, संचालक शैलेश शाह, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, संयोजन समिती अध्यक्ष विलास काळोखे, चंद्रभान खळदे, संदीप काकडे, संजय साने, निरुपा कानिटकर, उद्योजक राजेश म्हस्के, नंदकुमार शेलार, राजश्री म्हस्के, मनोज ढमाले, दत्तात्रय पडवळ, सुदाम कदम, सचिन टकले यांच्यासह विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळविलेल्या राष्ट्रीय खेळाडूंना पोपटराव पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.पोपटराव पवार पुढे म्हणाले, आज जगभर पाण्याची भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी  कमालीची खाली गेली आहे. आपल्या संतांनी, राष्ट्रपुरुषांनी अवलंबलेली जलनीती राबविणे आवश्यक आहे. आज ज्या भागात जास्त पाऊस पडतो, त्याच भागात पाणीटंचाई दिसते आहे. योग्य नियोजन करून पाण्याचे पुनर्भरण करता येते, ही काळाची गरज आहे. कार्यक्रमाचे प्रस्तावित संदीप काकडे यांनी केले. सूत्रसंचालन दीप्ती कन्हेरीकर आणि आर. आर. डोके यांनी केले. चंद्रभान खळदे यांनी आभार मानले............पोपटराव पवार पुढे म्हणाले, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस कमी होत चालला आहे. त्यामुळे पाणी पुनर्भरणासोबतच मातीसंवर्धन करणेही निकडीचे आहे. 

टॅग्स :Talegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसWaterपाणीHiware BazarहिवरेबाजारTemperatureतापमान