शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पाणी प्रश्न पेटणार? शहरी-ग्रामीण आमदारांमध्ये नाराजीची धास्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 21:58 IST

जलसंपत्ती नियमन प्राधिकरनाने सुध्दा पालिका प्रशासनाने त्यांच्याच वाट्याचे पाणी वापरावे, अधिकचे पाणी घेवू नये असे आदेश दिले आहेत.

पुणे: शहरातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळालेच पाहिजे, यासाठी शहरी आमदारांकडून पाणी कपातीला विरोध केला जात आहे. तर शेतक-यांच्या वाट्याचे त्यांना द्यावेच लागेल, अशी स्पष्ट भूमिका ग्रामीण भागातील आमदारांनी घेतली आहे. मात्र, निवडणूक काळातच मतदारांना पाणी मिळाले नाही तर सत्ताधारी लोकप्रतिनिधींना अडचणीचे होणार आहे. त्यामुळे आत्ताच पाण्याचे नियोजन केले तर लोकप्रतिनिधींना आगामी निवडणुकांना मतदारांसमोर जाता येईल, अशी चर्चा जलसंपदा विभागाच्या अधिका-यांमध्ये सुरु आहे. परंतु, सामोपचाराने प्रश्न सोडविण्याऐवजी दोन्ही भागातील आमदार पाण्यावरून भिडलेले दिसून येत आहेत. तर शेतकरी संघटनाही चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत.

पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणा-या धरणांमध्येही कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे पुण्याचे पाणीही चांगलेच पेटले आहे. त्यात पुणे महानगरपालिकेडून अधिकचे पाणी वापरले जात असल्याने ग्रामीण भागाला उन्हाळी आवर्तन सोडता येणार नाही, अशी चर्चा जलसंपदा विभागाकडून केली जात आहे. त्यामुळे शेतकरी संघटनांचे प्रतिनिधीही आक्रमक झाले आहेत. त्यातच उन्हाळ्यात ग्रामीण भागातील नागरिकांना आणि जनावरांना पिण्यासाठी पाणी राखून ठेवा, अशा सूचना ग्रामीण आमदारांकडून केल्या जात असल्याचे अधिका-यांकडून सांगितले जात आहे.

 जलसंपत्ती नियमन प्राधिकरनाने सुध्दा पालिका प्रशासनाने त्यांच्याच वाट्याचे पाणी वापरावे, अधिकचे पाणी घेवू नये असे आदेश दिले आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने आत्तापासूनच काटकसरीने पाणी वापरण्यास सुरूवात करण्याची आवश्यकता आहे. पुढील दोन ते तीन महिन्यानंतर लोकप्रतिनिधींना आगामी लोकसभा निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे. तसेच विधानसभेच्या निवडणुकाही लोकसभेबरोबर घेतल्या जातील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. परिणामी ऐन निवडणुकांच्या काळात नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागले तर विरोधकांच्या हातात आयते कोलित मिळणार आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण अशा दोन्ही भागातील नागरिकांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे. त्यादृष्टीने पुण्याच्या कारभा-यांनी याबबात लवकर पुढाकार घ्यायला हवा, अशी चर्चा जलसंपदा विभागात दबक्या आवाजात सुरू आहे.राजकारण न करता भविष्याचा विचार करावाजलसंपदा विभागाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 28 फेब्रुवारी रोजी रब्बी हंगामाचे आवर्तन सोडले जाणार आहे. तसेच १५ ते २० एप्रिलच्या दरम्यान उन्हाळी आवर्तन सोडले जाणार आहे. परंतु, पुणे महापालिकेने काटकसरीने पाणी वापरले नाही तर उन्हाळी आवर्तन रद्द करावे लागेल. जलसंपदा विभागातर्फे १५ जुलैपर्यंतच्या पाण्याचे नियोजन केले जाते. खडकवासला धरण प्रकल्पात मे महिन्यात अडीच ते तीन टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक ठेवावा लागतो. त्यामुळे राजकारण न करता भविष्याचा विचार करून आत्ताच पाण्याचे नियोजन करावे, अशी अपेक्षा जलसंपदा विभागाचे अधिकारी व्यक्त करत आहेत.

पुणे शहरातील नागरिकांकडून अधिकचे पाणी वापरले जात असल्याने ग्रामीण भागातील शेतीसाठी सोडल्या जाणा-या पाण्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी काटकसरीचे पाणी वापरावे. दुष्काळात ग्रामीण भागातील नागरिकांना व जनावरांना त्यांच्या वाट्याचे पाणी मिळाले नाही तर प्रशासनाला शेतक-यांच्या संतापाला सामोरे जावे लागेल. - राजेंद्र धावन पाटील, जिल्हा अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना----------------------जलसंपदा विभागाने नियोजन न केल्यामुळे सध्या धरणात पाणीसाठा कमी आहे. तसेच पालिकेकडून अधिकचे पाणी वापरले जाते आणि शेतीयोग्य पाणी परत केले जात नाही. मात्र, उन्हाळ्यात ग्रामीण भागाला धरणातून पाणी सोडले नाही तर शेतकरी संघटना आक्रमक होतील. पाण्याचे योग्य नियोजन करून रब्बी आणि उन्हाळी आर्वतन सोडावेच लागेल.- विठ्ठल पवार, प्रदेशाध्यक्ष, शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना-------------‘‘ पुण्याच्या पाणी प्रश्नाबाबत कालवा समितीच्या वरती असणा-या जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने निर्णय दिला आहे. त्यामुळे पालिकेने प्राधिकरणाच्या आदेशाप्रमाणे पाणी वापरले पाहिजे. सर्वांनी नियमाप्रमाणे पाणी वापरले तर शहरी व ग्रामीण भागाला त्यांच्या वाट्याचे पाणी मिळू शकेल. तसेच ग्रामीण भागासाठी उन्हाळी आवर्तन सोडण्यासाठी काहीच अडचण येणार नाही. परंतु, पालिकेकडून अधिक पाणी वापरत असल्याने उन्हाळी आवर्तन सोडता येणार नाही, असे जलसंपदा विभागाचे अधिकारी म्हणत असतील तर त्यांनी तसे कागदावर लिहून द्यावे. त्यानंतर काय करायचे ते आम्ही पाहू ’’ - राहूल कुल, आमदार, दौंड

टॅग्स :WaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका