शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी तंत्रज्ञानावर आधारित जल शुद्धीकर यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 20:00 IST

हे यंत्र पूर्णत: स्वयंचलित असल्याने पाण्यामध्ये क्लोरीन किती आहे याबाबत नियमित एसएमएस मोबाईलवर येण्याची सोय आहे...

ठळक मुद्देयंत्रामार्फत निर्जंंतुकीकरणजल हे प्रमाणबद्ध होणार असून पाण्यातील क्लोरिन नियमित राहणार आहे

भूगाव : दिवसेंदिवस वाढत असलेल्या अशुद्ध पाण्याच्या समस्येवर उपाय म्हणून मुळशी तालुक्यातील भुगाव ग्रामपंचायतीने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित निर्जंंतुकीकरण यंत्र बसविले आहे. पाण्यात टाकण्यासाठी पूर्णत: स्वयंचलित यंत्रामार्फत पाण्यातील क्लोरिन नियमित राहणार आहे.आधी पाण्याच्या टाकीमध्ये टीसीएल पावडर टाकली जात होती. परंतु, ही पावडर टाकण्यासाठी मनुष्यबळाची गरज होती. तसेच पावडर पाण्यामध्ये व्यवस्थित न विरघळता तळाला तशीच राहत  होती. या यंत्रामार्फत जल निर्जंंतुकीकरण हे प्रमाणबद्ध होणार असून पाण्यातील क्लोरिन नियमित राहणार आहे. हे यंत्र पूर्णत: स्वयंचलित असल्याने पाण्यामध्ये क्लोरीन किती आहे याबाबत नियमित एसएमएस मोबाईलवर येण्याची सोय आहे.यामुळे गावाला नियमित निर्जंतुक पाणी मिळेल. यंत्र सध्या प्रायोगिक तत्वावर बसवले असून कायमस्वरूपी बसवण्यास भूगाव ग्रामपंचायत इच्छुक आहे. सदर योजना भूगाव ग्रामपंचायत व इसॉल प्राईवेट लिमिटेड यांच्या पुढाकाराने चालू केली आहे. हे यंत्र अनेक विकसित व विकसनशील देशांमध्ये सक्रीय आहे.या योजनेची पाहणी करतेवेळी आदर्श सरपंच विजय सातपुते, उपसरपंच जयश्री कुंभार, माजी उपसरपंच सुरेखा कांबळे, माजी उपसरपंच प्रमिला चोंधे, आशिष मिरघे, सुरज शेडगे, अंकुश येनपुरे व इसॉल कंपनीचे संस्थापक अभिताभ होनप आणि कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी