शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस लाईनमध्ये येतेय तीन दिवसांतून एकदा पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 02:18 IST

पोलीसलाईनमधील नागरिकांची समस्या; पाणीपुरवठा विस्कळीत; नागरिकांना नाहक त्रास

पुणे : पोलीस लाईन या भागात दोन, तीन दिवसांतून एकदाच पाणी येते. ते पाणी अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ राहत नाही. असे त्या भागातील नागरिक म्हणत असून महापालिका पाणीपुरवठा अधिकारी दररोज पाणीपुरवठा करीत असल्याचा दावा करीत आहेत. पाणी नक्की जिरते कुठे, असा गंभीर प्रश्न नागरिकांसमोर उभा आहे.सोमवार पेठ येथील पोलीस लाईनमध्ये सर्व शासकीय कर्मचारी राहतात. त्या ठिकाणी एकूण चार मजल्याच्या आठ इमारती असून ३२ कुटुंबे वास्तव्यास आहेत. प्रत्येक इमारतीवर महापालिकेने बांधून दिलेली एक टाकी आहे. गेले सहा महिने झाले, येथील नागरिकांना पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे.सोमवार पेठ पोलीस लाईनमधील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात दोन-तीन दिवसांतून एकदाच पाणी येते. पाण्याची वेळ कधीही ठरलेली नसते. पाणी आले की अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ राहत नाही. महिलांना पाणी नसल्याने परिसरातील आजूबाजूला पाण्यासाठी फिरावे लागते. घरातील पाण्याची कामे करण्यासाठी पाण्याची वाट बघावी लागते. पाणीपुरवठा होत नाही, यासाठी नागरिकांनी नगरसेवक आणि आमदार यांच्याकडे तक्रार केली असून दखल घेतली जात नाही. महानगरपालिकेने एक टाकी बांधून दिली होती. पण त्या टाकीचे पाणी पुरत नसल्याने नागरिकांनी आणखी टाकी बांधण्याची मागणी केली. नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार सिंटेक्सच्या टाक्या बांधून देण्यात आल्या. परंतु या टाक्यांची सध्याची अवस्था फारच बिकट आहे. त्यांना झाकण नसून फरशी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे कधी कधी अशुद्ध पाणीपुरवठा होतो. तसेच महापालिकेकडून चार ते पाच वर्षांनी टाकीची स्वच्छता केली जाते. पाणीपुरवठा कधी तरी झाला तरी पाण्याचे प्रेशर फारच कमी असते.यामुळे टाकी भरण्यास फारच वेळ लागतो. सायंकाळी पाण्यासाठी नागरिकांना या भागात खूप फिरावे लागते. नगरसेवक टँकरची सोय करून देतात. परंतु चारमजली इमारती असल्याने पहिल्या मजल्यावर पाणी घेऊन जाण्यास काही वाटत नाही. इतर वरच्या मजल्यावरील लोकांना पाणी तळापासून वर घेऊन जाण्यास खूप त्रास होत आहे.सोमवार पेठ पोलीस लाईनमध्ये कुठलीही समस्या नाही. पण पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. येथे राहणारे सर्व नागरिक शासकीय सेवेत कार्यरत आहेत. आम्हाला तक्रार करायलासुद्धा भीती वाटते. तरीही आमच्या प्रभागातील नगरसेवक, आमदार यांच्याकडे तक्रार केली असून दखल घेतली गेली नाही. पाण्याची ही गंभीर समस्या सोडवावी, अशी सर्व नागरिकांची मागणी आहे.ऋषीकेश रोकडे , रहिवासीपाण्यासाठी आंदोलन होत आहे. सोमवार पेठ पोलीस लाईनसहित, नाना पेठ, वायएमसीए, घोडमळा, किºहाडवाडा या सर्व ठिकाणी पाण्याची समस्या जाणवत आहे. पाणीपुरवठ्याच्या कमतरतेमुळे मी टँकरची सोय करून दिली आहे, असे स्थानिक नगरसेवकांनी सांगितले.पूर्वी दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा होत असे. आता मात्र सकाळच्या ११ ते २ या वेळेत पाणीपुरवठा होतो. सोमवार पेठ पोलीस लाईनमध्ये आम्ही तपास केला असून त्या ठिकाणी व्यवस्थित पाणीपुरवठा होत आहे. पोलीस लाईन हा शेवटचा टप्पा असल्याने पाणी प्रेशर थोडेफार कमी असते. तसेच येथील टाक्या चौथ्या मजल्यावर असल्याने पाणी वर चढण्यास अडथळा होत आहे.- सूर्यकांत जमदाडे,उपअभियंता, स्वारगेट पाणीपुरवठा केंद्रदिवसातून सायंकाळी ४ ते ५ च्यादरम्यान कधी कधी पाणी येते. २० ते २५ मिनिटे पाणी असते. एवढ्या वेळात आम्हाला पाणी भरून घेता येत नाही. तसेच गेले सहा महिने झाले सर्व नागरिक इतर ठिकाणी पाणी भरण्यास जातात. दररोज टँकरचीसुद्धा सोय नसते. पाण्याच्या त्रासाची तक्रार करून नागरिक कंटाळले आहेत. महानगरपालिकेने यावर काहीतरी उपाय करावा. दिवसातून एकदा तरी ३, ४ तास आम्हाला पाणी मिळावे.- सुनीता सुपेकर, रहिवासी

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई