शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वारजे जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारी जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी गेले वाया

By राजू हिंगे | Updated: April 21, 2023 14:45 IST

वारजे येथील जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणीपुरवठा होणाऱ्या सर्व भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत

पुणे : पुणे महापालिकेच्या वारजे येथील जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारी जलवाहिनी खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला काही अंतरावर फुटली  आहे. त्याने लाखो लिटर पाणी वाया  गेले आहे. त्यामुळे वारजे येथील जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणीपुरवठा होणाऱ्या सर्व भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.  

खडकवासला धरणातून वारजे जलशुद्धीकरण केंद्राकडे सुमारे दीड ते दोन मीटर व्यासाच्या दोन जलवाहिन्या गेलेल्या आहेत. यापैकी जुनी जलवाहिनी फुटली असून धरणाच्या मागच्या बाजूला असलेल्या पुलावरून पाण्याचा उंच फवारा उडत होते.  एका बाजूला पाण्याची टंचाई निर्माण झालेली असताना दुसरीकडे लाखो लिटर पाणी वाया  गेले आहे. जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळताच पालिकच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी पंपिगचा पाणीपुरवठा बंद केला आहे. या जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम होती घेतले आहे. 

जुन्या जलवाहिन्यांचा प्रश्न एैरणीवर

 पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीसह इतर भागात जाणाऱ्या जलवाहिन्या तब्बल वीस वर्षांपेक्षा जास्त जुन्या झाल्या  आहेत. त्यातील अनेक जलवाहिन्या  जीर्ण झाल्या आहेत. या जलवाहिन्या अचानक  फुटुन लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे  या जुन्या जलवाहिन्यांचे सर्वेक्षण होणे आवश्यक आहे.  

जलवाहिनी दुरूस्तीच्या कामाला तातडीने सुरुवात 

वारजे येथील जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारी जलवाहिनी  फुटली आहे. त्यामुळे  या केद्रांवरून पाणीपुरवठा होणा०या सर्व भागाचा पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे. जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. - अनिरूध्द पावसकर, पाणीपुरवठा विभागप्रमुख , पुणे महापालिका

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणीGovernmentसरकार