शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

आळंदीत इंद्रायणीवर जलपर्णीचा थर, भाविकांची तीव्र नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 3:09 AM

देहू येथे संत तुकाराममहाराज बीजसोहळा होत असल्याने आळंदीत इंद्रायणी नदीला पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. इंद्रायणी नदीपात्रात भाविकांना स्नानास पाणी मिळावे म्हणून सोय करण्याची मागणी होती. मात्र, या पाण्यासमवेत आळंदीतील नदीपात्राला वरील बंधा-यातून जलपर्णी वाहून आल्याने जलपर्णीच्या विळखा पडला आहे.

आळंदी - देहू येथे संत तुकाराममहाराज बीजसोहळा होत असल्याने आळंदीत इंद्रायणी नदीला पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. इंद्रायणी नदीपात्रात भाविकांना स्नानास पाणी मिळावे म्हणून सोय करण्याची मागणी होती. मात्र, या पाण्यासमवेत आळंदीतील नदीपात्राला वरील बंधा-यातून जलपर्णी वाहून आल्याने जलपर्णीच्या विळखा पडला आहे. यामुळे भाविकांच्या स्नानाची सोय होण्याऐवजी गैरसोयच झाल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली. यातून येथील नियोजनावर भाविकांनी ताशेरे ओढले.तीन मार्च रोजी संत तुकाराम बीज सोहळा झाला. यानिमित्त आळंदी-देहूमध्ये राज्यातून भाविकांची मांदियाळी ‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’चा नामजयघोष करीत हरिनामाच्या गजरात देवदर्शनासाठी आली होती. भाविकांच्या स्नानाची आळंदीत व्यवस्था होण्यासाठी इंद्रायणी नदीपात्रात आळंदी परिक्षेत्राच्या धरणातून मागणीप्रमाणे पाणीदेखील सोडण्यात आले. आळंदी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर, पाणीपुरवठा समितीचे सभापती उपनगराध्यक्ष सागर भोसले, मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी याबाबत इंद्रायणी नदीपात्रात पाणी कमी झाल्याचा अहवाल मिळाल्याने मागणी करण्याचा निर्णय घेतला होता. बीज सोहळ्याला देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांनी इंद्रायणी नदीत तीर्थक्षेत्री स्नानमाहात्म्य जोपासत स्नानदेखील केले. बीज झाल्यानंतर बंधाºयातून खाली पाणी सोडण्यासाठी खुले केलेले बर्गे (फळ्या) बंद न केल्याने संत तुकाराम बीजेला करण्यात आलेली सोय नंतर मात्र गैरसोय ठरली. यात केवळ नियोजनाचा अभाव असल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त करून आळंदी नगर परिषदेच्या प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. बीज झाल्यानंतरच्या नियोजनाचा परिषद प्रशासनाला विसर पडल्याने गैरसोय वाढल्याचे भाविकांनी सांगितले.सध्या आळंदी येथे इंद्रायणी नदीपात्रात येणाºया पाण्याचा प्रवाह वाढला आहे. पाण्याचा निर्धारित साठा वाढल्याने बंधाºयातील पाणीपातळी वर आली. यामुळे बंधाºयातील जलपर्णी पाण्याच्या प्रवाहात पुढे वाहून आल्याने सोय होण्याऐवजी आता गैरसोय होऊ लागली. जलपर्णी काढण्याची प्रक्रिया निविदेत अडकली असून, इंद्रायणी नदीपात्रावरील जलपर्णी भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. मात्र, इंद्रायणी नदीपात्राच्या दुतर्फा अस्वच्छतेचे साम्राज्य असल्याने स्वच्छ तीर्थक्षेत्र आळंदीला अस्वच्छतेचे ग्रहण लागल्याची चर्चा होत आहे.स्वच्छतेच्या व आरोग्याच्या दृष्टीने इंद्रायणी नदीतील प्रवाह सतत वाहता असणे गरजेचे आहे. यासाठी पुणे पाटबंधारे विभागाकडे बंधाºयातून आळंदीकडे इंद्रायणी नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी केली होती. मात्र, पाणी आळंदीत आल्यानंतरच्या नियोजनाचा आळंदी नगर परिषद प्रशासनाला विसर पडला.संत तुकाराम बीज सोहळ्याला देहू येते येताना तसेच काही भाविक परतीच्या प्रवासात आळंदीत संत ज्ञानेश्वरमहाराज संजीवन समाधी दर्शनाला परंपरेने येतात. ‘श्रीं’चे दर्शन व तीर्थक्षेत्री स्नानाची गैरसोय होऊ नये, यासाठी पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती.बीजेपर्यंत जलपर्णीमुक्त असलेली इंद्रायणी बीजेनंतर मात्र पाण्याबरोबर वाहून आलेल्या जलपर्णीने युक्त झाल्यानेयेथे नागरिक व भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे. भाविकांना स्नान करता आले नाही की पायावर पाणी घेता आले नाही. या गैरसोयीस आळंदीत त्यांना सामोरे जावे लागले.इंद्रायणी करणार जलपर्णीमुक्त : नगराध्यक्षा उमरगेकरतीर्थक्षेत्र आळंदीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीपात्रातील पाण्याबरोबर वाहून आलेली जलपर्णी बाहेर काढण्यात येईल, असे नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी सांगितले. आळंदीतील पाण्याची पातळी खालावली होती. तुकाराम बीज सोहळ्याला भाविकांची सोय करण्यासाठी नदीपात्रात पाणी सोडले होते. यामुळे भाविकांची स्नानाची सोय संत तुकाराममहाराज बीज दिनी ३ मार्च रोजीा झाली. त्यानंतर पाणी येतच राहिल्याने त्यारोबर महापालिकेच्या हद्दीतील नदीपात्रातून जलपर्णी आळंदीकडे खाली आली. यापुढील काळात जलपर्णीमुक्त इंद्रायणी नदीपात्र ठेवण्याचे नियोजन आहे. यासाठी निविदादेखील आल्या आहेत. लवकर प्रशासकीय कामकाज झाल्यानंतर जलपर्णी काढण्यात येईल. आळंदीतील नदीपात्र जलपर्णीमुक्त तसेच नदीचा परिसर दुतर्फा स्वच्छ, सुंदर करणार असल्याचे नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी सांगितले.

टॅग्स :AlandiआळंदीAlandi Nagar Parishadआळंदी नगर परिषदPuneपुणे