लोणावळा : कार्ला गडाच्या डोंगरावरील पाणी वाहून जाण्याकरिता डोंगराला बनविण्यात आलेला चर जागोजागी खराब झाल्याने डोंगरावरून थेट कार्ला लेणीवर व एकवीरा देवीच्या मंदिरावर पाणी पडत आहे. या पाण्यामुळे देवीच्या गर्भ गाभाºयात पाण्याचा निचरा होऊ लागला आहे़ पाण्याच्या या निचºयामुळे मंदिराला धोका होऊ शकतो़ याकरिता लवकरात लवकर भारतीय पुरातत्त्व विभाग वएकवीरा देवस्थान ट्रस्ट यांनी उपाययोजना कराव्यात़ तसेच डोंगरावरील खराब झालेला चर पूर्ववत करावा, अशी मागणी माजी सरपंच व देवीचे गुरव पुजारी मनोज देशमुख यांनी केली आहे.कार्ला गडावरील एकवीरा देवीच्या दर्शनाकरिता वर्षभर भाविकांची रिघ लागलेली असते. या गडावर येण्याकरिता मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गापासूनच अडथळा शर्यत पार करावी लागत आहे. पावसाच्या पाण्यामुळे कार्ला फाटा ते पायथा हा रस्ता जागोजागी वाहून गेल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. पायथा ते पार्किंग रस्ता तर खड्डयातच गेल्याने हा घाटाचा रस्ता चढताना व उतरताना भाविकांना तसेच स्थानिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग व देवस्थान ट्रस्टने तातडीने या मार्गावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पार्किंगपासून सुरू होणाºया पायºयादेखील जागोजागी वाहून गेल्या आहेत. या पायºयांवरून चालताना अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ तसेच मागील रविवारी पायºयांवर एक मोठा दगड सैल होऊन आला आहे. तो देखील अद्याप बाजूला करण्यात आलेला नाही. भारतीय पुरातत्त्व विभागाने तातडीने याची दखल घेत पायºयांची दुरुस्ती करावी, अशी मागणी भाविकांनी केली आहे.पूर्वी डोंगराला चर करण्यात आल्याने मंदिर व लेणी भागाच्या वरील डोंगराचे पाणी थेट खाली न पडता चराने दूरवरून खाली येत होते. आता चर खराब झाल्याने ते पाणी मंदिराच्या परिसरात व लेणीच्या प्रवेशद्वाराजवळ पडत आहे. मागील काळात मंदिर परिसरात दरड पडण्याच्या घटना घडल्या आहेत. पावसामुळे डोंगराचा भाग कमकुवत होत असल्याने पुरातत्त्व विभागाने याची दखल घेत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी मनोज देशमुख यांनी केली आहे.
एकवीरा मंदिराच्या गाभाऱ्यात साचले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 01:06 IST