शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचा वाद पुन्हा न्यायालयात, तीन व्यक्तींनी केली याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 01:21 IST

पुण्याच्या पाणीप्रश्नावरून सुरू झालेला वाद काही दिवस शांत झाला होता. परंतु, पुणे महापालिकेकडून वापरल्या जात असलेल्या अधिकच्या पाण्याबाबत तीन व्यक्तींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

पुणे : पुण्याच्या पाणीप्रश्नावरून सुरू झालेला वाद काही दिवस शांत झाला होता. परंतु, पुणे महापालिकेकडून वापरल्या जात असलेल्या अधिकच्या पाण्याबाबत तीन व्यक्तींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे पुण्याच्या पाण्याचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर येणार आहे. उच्च न्यायालयाकडून पुणे विभागाच्या जलसंपदा विभागाला या संदर्भातील नोटीसही प्राप्त झाली आहे.पुणे महापालिका व जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांमधील पाण्यावरून सुरू असलेला वाद सर्वश्रुत आहे. पुण्याच्या पाण्याबाबत थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष घालावे लागले होते. त्यानंतर जलसंपदा विभागाकडून पालिकेला मंजूर पाण्यापेक्षा अधिक पाणी दिले जात आहे. मात्र, पालिकेला १,१५० एमएलडी पाणी मंजूर असताना पालिका १,३५० एमएलडी पाणी घेत आहे. त्यामुळे लक्ष्मण भोंडवे, प्रताप पाटील यांच्यासह आणखी एका व्यक्तीने न्यायालयात याचिका दाखल केली.पुणे महापालिका व जलसंपदा विभागाकडून महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमावलीचे पालन केले जात नाही, अशी तक्रार माजी सरपंच विठ्ठल जराड यांनी प्राधिकरणाकडे केली होती. त्यावर प्राधिकरणाने पालिकेला केवळ मंजूर झालेले पाणी द्यावे; अधिकचे पाणी देऊ नये, असे आदेश दिले होते. त्यानुसार जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पालिकेचे पंप बंद करून पाणी तोडण्याची कार्यवाही केली. परंतु, राजकीय दबाव वाढल्याने पाणीवितरणावर जलसंपदा विभागाने नरमाईची भूमिका घेतली. आता जलसंपदा विभागालाच न्यायालयात पालिकेच्या अधिकच्या पाणीवापराबाबत बाजू मांडावी लागेल.उन्हाळी आवर्तन रद्द करण्याचा निर्णय घेतलाखडकवासला धरण प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून ग्रामीण भागाला उन्हाळी आवर्तन सोडण्यासंदर्भातील निर्णय जलसंपदा विभागाच्या कालवा समितीमध्ये घेण्यात आला होता. मात्र, पावसाने पाठ फिरविल्याले धरणात गेल्या वर्षापेक्षा चार टीएमसीने पाणीसाठा कमी झाला. त्यामुळे उन्हाळी आवर्तन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील काही व्यक्तींनी न्यायालयात धाव घेतल्याचे बोलले जाते.