शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात पाणी कपात सुरुच; दोनच पंप सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 03:45 IST

पुण्याच्या पाणीकपातीवर गदारोळ होऊन मंत्र्यांपर्यंत तक्रार गेल्यानंतरही पाटबंधारे विभागाने एक पंप बंदच ठेवला आहे.

पुणे : पुण्याच्या पाणीकपातीवर गदारोळ होऊन मंत्र्यांपर्यंत तक्रार गेल्यानंतरही पाटबंधारे विभागाने एक पंप बंदच ठेवला आहे. त्यामुळे लष्कर भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी ४०० एमएलडी पाण्याची गरज असताना केवळ २५० एमएलडीच पाणी उचलता आले. त्यामुळे शुक्रवारी पूर्व भागाचा पाणीपुरवठा विस्कळित झाला. शनिवारीही कमी पाणी मिळणार आहे.

कालवा समितीच्या बैठकीनंतरदेखील महापालिका मंजूर पाण्यापेक्षा अधिक पाणी उचलत असल्याचे सांगत पाटबंधारे विभागाने महापालिकेला कोणतीही पूर्वकल्पना न देता बुधवारी दुपारी चार वाजता तीनपैकी दोन पंपिंग पंप बंद करून केवळ एकच पंप सुरू ठेवला. यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी विस्कळीत झाला. याबाबत प्रचंड गदारोळ झाल्यानंतर पाटबंधारे विभागाने नियमित पाणीपुरवठा करण्याचे मान्य केले. परंतु एकूण तीनपैकी केवळ दोन पंप सुरू केले. अद्यापही एक पंप बंद असल्यामुळे पाणीकपात सुरूच आहे. यामुळे शहराच्या पूर्व भागाचा पाणीपुरवठा अद्यापही विस्कळीत आहे. न्यू कोपरे कोढी येथील नवीन पंपिंग स्टेशन महापालिकेने आधुनिक यंत्र बसविले आहे. येथे एकूण ८ पंपिंग पंप बसविले आहेत. यापैकी सध्या तीन पंपिंग पंप नियमित सुरू असतात. यात एक पंप १२५ एमएलडी पाणी उचलतो.

केवळ दोन पंप सुरू असल्यामुळे २५० एमएलडी पाण्याचा लष्कर जलकेंद्राला पुरवठा होत आहे. प्रत्यक्षात लष्कर जलकेंद्र पूर्णक्षमतेने सुरू राहण्यासाठी चारशे एमएलडी पाण्याची गरज असते. एक पंप बंद असल्यामुळे शहराच्या पूर्व भागाचा पाणीपुरवठा अद्यापही विस्कळीत आहे.पालकमंत्र्यांकडून कपातीचा निर्णय नाहीशहराला पाणीपुरवठा करणारी खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चार धरणांमध्ये सध्या २७ टीएमसी पाणीसाठा आहे. तरीही पुण्याच्या पाणीपुरवठ्यात रोज तब्बल २०० एमएलडीने कपात करण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र पालकमंत्री गिरीश बापट यांनी पाणीकपातीचा कुठल्याही निर्णय घेतला नसून, सर्वांना समान पाणीपुरवठा करण्याचा निश्चित करण्यात आले आहे. असे असताना महापालिकेला कोणतीही पूर्वसूचना न देता पोलिसांच्या उपस्थितीत बुधवारी दुपारी चार वाजल्यापासून दोन पंप बंद केले होते. त्यावर महापौर मुक्ता टिळक यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधून पुणे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती.

त्यावर यापुढे १३५० एमएलडी पाणी शहराला देण्याच्या सूचना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेचे पंप सुरू झाल्याचे टिळक यांनी सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आदेश दिल्यानंतर महापालिकेचा बंद केलेल्या दोनपैकी केवळ एकच पंप सुरू करण्यात आला आहे.

टॅग्स :WaterपाणीPuneपुणे