शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारणाची कामे निकृष्ट, पावसाच्या पाण्याबरोबरच निधीही गेला वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 02:38 IST

इंदापूरच्या पश्चिम भागातील वन विभागाच्या जागेत कोट्यवधी रुपयांची जलसंधारणाची कामे कागदोपत्री जरी पूर्ण झाली असली तरी डिसेंबरअखेरच या भागात या वर्षी पावसाने उच्चांक गाठूनही सर्व बंधारे कोरडे पडल्याने ऐन उन्हाळ्यात वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावीच लागणार आहे.

लासुर्णे - इंदापूरच्या पश्चिम भागातील वन विभागाच्या जागेत कोट्यवधी रुपयांची जलसंधारणाची कामे कागदोपत्री जरी पूर्ण झाली असली तरी डिसेंबरअखेरच या भागात या वर्षी पावसाने उच्चांक गाठूनही सर्व बंधारे कोरडे पडल्याने ऐन उन्हाळ्यात वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावीच लागणार आहे.इंदापूरच्या पश्चिम भागातील वन विभागाच्या सर्व निकृष्ट दर्जाच्या कामांची व संबंधित वन विभागाचे अधिकारी यांची वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.यंदा सर्वत्रच पावसाने उच्चांक गाठल्याने इंदापूरच्या पश्चिम भागात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे मंजूरझाली होती.ही कामे इंदापूरच्या पश्चिमेस कळस, कडबनवाडी, बिरंगुडी आदी भागात झाली. परंतु, या भागातील वन विभागाच्या हद्दीत जलसंधारणाची सर्व कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत.यामुळे डिसेंबर महिन्यातच या भागातील सर्व बंधारे कोरडे पडले आहेत. एकाही बंधाºयात पाणी नसल्याने वन्यप्राण्यांना अत्ताच पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ऐन उन्हाळ्यात हीच परस्थिती भयानक होणार आहे.या वन विभागाचे अधिकारीच ठेकेदार म्हणून काम करीत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे अधिकारीच ठेकेदार झाला तर कामाला दर्जा मिळणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.यामुळे वन विभागाने या इंदापूरच्या पश्चिम भागातील जलसंधारणाच्या सर्व कामाची व संबंधित अधिकाºयांची वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.चौकशीची मागणीया भागातील जेथे जलसंधारणाची कामे झाली आहेत ती निकृष्ट झाली आहे. यामुळे या ठिकाणी साठलेले पाणीही वाहून गेले असूनत्यामुळे तेथील पावसाचे पाणी वाया गेले. यात शासनाचा कोट्यवधी रूपायांचा निधी वन विभागाच्या अधिकाºयांमुळे पाण्यात गेला आहे.यामुळे वन विभागाने या भागातील सर्व कामांची तसेच वन विभागाच्या अधिकाºयांची वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या