शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचा तिढा कायमच; जलसंपदाच्या इशाऱ्यावर पालिकेत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 03:49 IST

जलसंपदा विभागाने महापालिकेला दिलेल्या ३५४ कोटी रुपयांची थकबाकी जमा करा अन्यथा पाणीपुरवठा बंद करू, या इशा-यावर महापालिकेच्या बुधवारी झालेल्या सभेत जोरदार चर्चा झाली. याबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू असून पाणीपुरवठा बंद होणार नाही, अशी ग्वाही पाणीपुरवठा विभाागाने सभागृहाला दिली.

पुणे : जलसंपदा विभागाने महापालिकेला दिलेल्या ३५४ कोटी रुपयांची थकबाकी जमा करा अन्यथा पाणीपुरवठा बंद करू, या इशा-यावर महापालिकेच्या बुधवारी झालेल्या सभेत जोरदार चर्चा झाली. याबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू असून पाणीपुरवठा बंद होणार नाही, अशी ग्वाही पाणीपुरवठा विभाागाने सभागृहाला दिली.जलसंपदा खात्याने महापालिकडे पाणी घेतल्याची तब्बल ३५४ कोटी रुपयांची थकबाकी दाखवली आहे. ती जमा केली नाही तर २० मार्चला पाणी देणे बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. २० मार्चला पाणीपुरवठा बंद झाला नाही, मात्र त्याचे पडसाद सर्वसाधारण सभेत उमटले. विशाल तांबे यांनी यावरून प्रशासनाला धारेवर धरले, तर सुभाष जगताप व अन्य सदस्यांनी प्रश्नांचा भडिमार करून प्रशासन पाण्याच्याबाबतीत दुर्लक्ष करत आहे, असा आरोप केला. याची सविस्तर माहिती सभागृहाला त्वरित देण्यात यावी, प्रशासन सर्वसाधारण सभेचा अधिकार स्वत:कडे घेऊ पाहत आहे, अशी टीका त्यांनी केली.काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी यावर थकबाकीच्यासंदर्भात अधिकाºयांच्या बैठकीत तडजोड झाली व त्यात ४७ कोटी रुपये देण्याचे ठरले, हे पैसे देण्याचे तुम्ही कोणत्या अधिकारात ठरवले, अशी विचारणा केली. पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांनी ही रक्कम थकबाकीपैकी नाही, वेगळी आहे असे स्पष्ट केले. थकबाकीच्यासंदर्भात ते म्हणाले, की यापूर्वी ९७ टक्के पाण्याचा वापर पिण्यासाठी होत होता. तर ३ टक्के व्यावसायिक वापरासाठी. आता हे प्रमाण बदलले आहे व व्यावसायिक वापर अधिक झाला आहे. त्याची ४७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही रक्कम अदा करण्यात आलेली नाही, त्यावर चर्चा सुरू आहे.जलसंपदा विभागाने ३५४ कोटी रुपयांची अवास्तव थकबाकी दाखवली आहे. जुन्या बेबी कालव्याचे भाडे महापालिकेला लावण्यापासून ते आवश्यकतेपेक्षा जादा पाणी उचलण्यापर्यंत अनेक गोष्टींचा त्यात समावेश आहे, अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली. पाण्याचे आतापर्यंत आॅडिट का केले नाही, असे सुभाष जगताप यांनी विचारले तर दरवर्षी मार्चअखेरला त्यांचे पैसे दिले का जात नाही असे विशाल तांबे म्हणाले. याबाबत प्रशासनाने त्वरित बैठक घ्यावी, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले.खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जलसंपदा खात्याने दाखवलेली थकबाकी चुकीची नाही, बरोबर आहे. याबाबत वरिष्ठ स्तरावर निर्णय होईल. राज्य सरकार व जलसंपदा खाते त्यात असेल. त्यामुळे स्थानिक स्तरावर ही थकबाकी बरोबर आहे, यापेक्षा जास्त काही सांगता येणार नाही. पाण्याचा व्यावसायिक वापर वाढला असल्याचे महापालिकेने प्रतिज्ञापत्रकात दिले आहे. त्यानुसार फरक काढण्यात आलेला आहे.

टॅग्स :Puneपुणे