शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीवर ‘वॉच’

By admin | Updated: September 16, 2015 02:44 IST

दहशतवादी घटनांमध्ये बॉम्ब ठेवण्यासाठी दुचाकी अथवा चारचाकी वाहनांचा वापर केल्याचे आढळून आले आहे. दहशतवादी कारवायांमध्ये सामील व्यक्तींकडून अशा वाहनांचा वापर

- संजय माने,  पिंपरीदहशतवादी घटनांमध्ये बॉम्ब ठेवण्यासाठी दुचाकी अथवा चारचाकी वाहनांचा वापर केल्याचे आढळून आले आहे. दहशतवादी कारवायांमध्ये सामील व्यक्तींकडून अशा वाहनांचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे दक्षतेच्या उपाययोजनांचा भाग म्हणून जुनी वाहने खरेदी-विक्री करणाऱ्यांवर ‘वॉच’ ठेवणे आवश्यक आहे. पुणे शहर पोलिसांनी वाहन खरेदी-विक्री करणारे एजंट, तसेच गॅरेजमालक यांची बैठक घेऊन योग्य त्या सूचना दिल्या आहेत. पिंपरी-चिंचवडमधील वाहन खरेदी-विक्री व्यवसायातील लोकांना याबाबत अधिक खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे. जुनी वाहने कोणी कमी किमतीत विक्री करीत असेल, अथवा कोणी कमी किमतीत अशी वाहने घेण्याचा प्रयत्न करत असेल, तर अशा घटनांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. वाहन खरेदी करणाऱ्याने आरसीटीसी पुस्तकातील नोंदीनुसार वाहनाच्या चासीचा क्रमांक, आरटीओ नोंदणी क्रमांक एकच आहे का, याची खात्री करावी. वाहन विक्री करणाऱ्याचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, आवश्यक ती कागदपत्रांची पडताळणी करावी. कोणी वाहनविक्रीची घाई करीत असेल तर त्याबद्दल शंका आल्यास पोलिसांकडे त्वरित संपर्क साधला पाहिजे. वाहन खरेदी-विक्रीचे रजिस्टर ठेवून वेळच्या वेळी नोंदी ठेवणे गरजेचे आहे. गॅरेजवाल्यांनीही संशयित वाहन दुरुस्तीस आल्यास त्वरित पोलिसांना माहिती दिली पाहिजे, अशा सूचना दहशतवादविरोधी पथकाच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.१पिंपरी-चिंचवडमध्ये चिंचवड, आकुर्डी, भोसरी, संभाजीनगर, काळेवाडी, सांगवी व अन्य भागांत ठिकठिकाणी जुनी वाहने खरेदी-विक्री करणारे व्यावसायिक आहेत. त्यांची संख्या १००हून अधिक आहे. वाहन खरेदी-विक्रीचे व्यवहार त्यांच्यामार्फत होत असल्याने त्यांनी अधिक सजगता आणि सतर्कता दाखविणे गरजेचे आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. २इस्लामिक स्टेट असा उद्देश बाळगून कार्यरत असलेल्या इसिस (इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सीरिया) या दहशतवादी संघटनेने टिष्ट्वटर, यू ट्यूब, फेसबुक, गूगल अशा सुमारे ९० हजारांहून अधिक सोशल साइट अकाउंटच्या माध्यमातून प्रचार सुरू ठेवला आहे. सोशल साइटच्या माध्यमातून इसिसची माहिती मिळविण्यात रस असलेल्यांमध्ये चिंचवडमधील तरुण आघाडीवर असल्याचे गुप्तचर संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात निदर्शनास आले आहे. ३इंटरनेटवरून इसिसची माहिती मिळविण्याची अभिरुची बाळगणाऱ्यांचे प्रमाण अधिक असलेल्या टॉप शहरांमध्ये श्रीनगर, तसेच गुवाहाटीपाठोपाठ महाराष्ट्रातील चिंचवड अग्रस्थानी आहे. पाकिस्तानच्या ‘सिमी’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेले काही युवक यापूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांना आढळून आले होते. तसेच, पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाच्या घटनेतील आरोपी रियाज भटकळ याचे साथीदार काही दिवस पिंपरी-चिंचवडमध्ये वास्तव्यास असल्याचेही धागेदोरे मिळाले होते. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांनी अधिक लक्ष केंद्रित केले आहे.वाहनाचा गुन्ह्यातील वापरजुनी वाहने खरेदी-विक़्री करताना ते वाहन एखाद्या गुन्ह्यात वापरले आहे का? समाजविघातक कृत्यांमध्ये सहभाग असे काही गुन्हे वाहनमालकांवर दाखल आहेत का, याची माहिती घेऊनच ग्राहकांनी वाहने खरेदी-विक्रीचा व्यवहार करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.