शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांच्या वस्तूखरेदीवर वॉच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 03:32 IST

लाभार्थीचे नाव, फोन नंबर, सहीचे रेकॉर्ड ठेवणार

पुणे : महापालिकेच्या अंदाजपत्रकातील कोट्यवधी रुपये दर वर्षी कचऱ्याच्या बकटे, कापडी पिशव्या व अन्य वस्तू खरेदी करून नागरिकांना वाटप करण्यासाठी खर्च करण्यात येतात; परंतु यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असून, यावर अंकुश ठेवण्यासाठीप्रशासनाने कडक पाऊल उचलले आहेत.यामध्ये यापुढे कोणत्याही वस्तूचे वाटप करताना संबंधित लाभार्थीचे नाव, पत्ता, फोन नंबर व सही सर्व रेकॉर्ड ठेवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. सर्व माहितीची शहानिशा केल्यानंतर संबंधित ठेकेदाराला बिलाचे पैसे अदा करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दिली.महापालिकेच्या वतीने गेल्या पाच वर्षांत तब्बल १५ कोटी रुपये खर्च करून ११ लाखांपेक्षा अधिक बकेट वाटप केल्या आहेत. यंदा देखील महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये केवळ बकेट खरेदीसाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे; परंतु आता बकेट खरेदीची गरज नसल्याचे सांगत प्रशासनाने नगरसेविकांची बकेट खरेदी रोखली होती; परंतु प्रशासनाने काही अटींवर परवानगी दिली आहे. बकेट प्रमाणेच नगरसेवकांकडून पिशव्या खरेदीवर देखील कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जाते. याबाबत निंबाळकर म्हणाले की, नगरसेवकांकडून कापडी पिशव्याची खरेदी करण्यावर बंदी नसली, तरी यावेळी खास वॉच ठेवण्यात येणार आहे. 

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिका