शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यातच भिरकावतात कचरा, नागरिकांचे प्रबोधन करूनही फायदा होत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 02:24 IST

वारजे येथील कालवा रस्त्यावर जकात नाका ते वर्धमान पेट्रोल पंप या सुमारे सव्वा किमीच्या परिसरात तीन ठिकाणी नागरिकांद्वारे रस्त्यावर कचरा टाकल्याने रस्त्याचीच कचरा कुंडी होत आहे.

वारजे - वारजे येथील कालवा रस्त्यावर जकात नाका ते वर्धमान पेट्रोल पंप या सुमारे सव्वा किमीच्या परिसरात तीन ठिकाणी नागरिकांद्वारे रस्त्यावर कचरा टाकल्याने रस्त्याचीच कचरा कुंडी होत आहे. याबाबत जनजागृती करूनही नागरिकांच्या मानसिकतेत बदल होत नसल्याने पावसाने परिसरात दुर्गंधी पसरत आहे.पेट्रोल पंपाजवळील मैदानाशेजारी (नादब्रह्म मागची बाजू) फुटपाथवरच सर्रास कचरा टाकल्याचे अनेकदा दिसून येते. या ठिकाणी पालिकेने हा फुटपाथ गेल्याच वर्षी बांधून पूर्ण केला आहे. तरीही या ठिकाणी जवळजवळ दररोजच मोठ्या प्रमाणात कचरा पडत आहे. भले रोज सकाळी पालिकेद्वारे या भागाची स्वच्छता होत आहे. तरीही संध्याकाळपासून जो कचरा पडायला सुरू होतो ते सकाळपर्यंत मोठे ढीग साचतात.दुसरे या रस्त्यावरील दत्त मंदिराच्या समोरच्या भागात रस्त्याच्या कडेलादेखील कचरा कधी कधी टाकलेला निदर्शनास येत आहे. हे प्रमाण कमी जरी असले तरी त्याने आसपासच्या नागरिकांना त्रास हा होतच आहे. तिसरे महत्त्वाचे ठिकाण म्हणजे आंबेडकर चौकातील रजपूत या जुन्या इमारतीच्या मागच्या बाजूस व शेजारील बोळात कायम कचरा पडत असतो. कर्मचाऱ्यांनादेखील या ठिकाणी स्वच्छता करताना मर्यादा पडत आहेत. याच ठिकाणी रस्त्याच्या विरुद्ध बाजूला ये-जा करण्याच्या बोळातदेखील कचरा पडत आहे.कचरा मनोवृत्तीहा भाग पालिकेत समाविष्ट होऊन अनेक वर्षे लोटूनही अद्यापही लोकांच्या मानसिकतेत फरक पडत नसल्याने व अगदी नाममात्र दरात अगदी घरोघरीदेखील लहान-मोठ्या कचरा व घंटागाड्या जाऊनही काही नागरिकांच्या हेकेखोर वृत्तीने या समस्येचे उच्चाटन होण्यास मर्यादा पडत आहे. एकाने टाकलेला कचरा बघून दुसºयाची पण त्या ठिकाणीच कचरा टाकण्याची मनोवृत्ती बळावत असल्याने समस्येत भरच पडत आहे.मधुकर कारकुड, विभागीय आरोग्य निरीक्षक, वारजे कर्वेनगर - चर्च परिसरातील निवडक काही घरे अद्यापही घंटागाडीशी जोडण्याचे काम बाकी राहिले आहे. काम अंतिम टप्प्यात असून लवकरचपूर्ण होईल.काही वेळा दंडात्मक कारवाई करताना कर्मचाºयांवर दबाव टाकला जातो. त्यामुळेदेखील परिसरात कचरा वाढण्यास मदत होते. याबाबतीत आंबेडकर चौक व आसपासच्या भागात नागरिकांबरोबरच काही व्यावसायिकदेखील कचरा टाकत असल्याचे दिसून येत आहे. यांच्यावर दंडात्मक कारवाई बरोबरच गुन्हे दाखल करण्याचे कामदेखील प्रस्तावित आहे. 

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या