व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाची विजयी सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:19 IST2021-03-04T04:19:12+5:302021-03-04T04:19:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पहिल्या व्हिजन करंडक तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत दुसऱ्या सामन्यात टिळक जाधव (३ ...

Warrock Vengsarkar Cricket Academy team's winning opener | व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाची विजयी सलामी

व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाची विजयी सलामी

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पहिल्या व्हिजन करंडक तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत दुसऱ्या सामन्यात टिळक जाधव (३ विकेट व ३२ धावा) याने दोन्ही डावात केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने २२ यार्डस संघाचा ८ गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली.

सिंहगड रस्त्यावरील व्हिजन स्पोर्ट्स सेंटर येथे सुरू असलेल्या तीन दिवसीय लढतीच्या सामन्यात काल पहिल्या डावात व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने ४१ षटकांत ५ बाद २१२ धावा केल्या. तत्पूर्वी पहिल्या डावात २२ यार्डस संघाचा डाव ३८ षटकांत १५० धावांवर संपुष्टात आला. याच्या उत्तरात व्हेरॉक संघाचा डाव २७७ धावांवर आटोपला.

पहिल्या डावात व्हेरॉक संघाने १२७ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात या आव्हानाचा पाठलाग करताना २२ यार्डस संघ ३३.३ षटकांत १४० धावांवर गारद झाला. व्हेरॉक संघाकडून नारायण चौधरी, रोहित चौधरी, टिळक जाधव यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. विजयासाठी अवघ्या १४ धावाचे लक्ष्य व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने १.३ षटकात २ गडी गमावून पूर्ण केले. सामन्याचा मानकरी टिळक जाधव ठरला.

संक्षिप्त धावफलक:

पहिला डाव : २२ यार्डस : ३८ षटकांत सर्वबाद १५० धावा वि. व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी : ५४.४ षटकांत सर्वबाद २७७ धावा, सूरज गोंड ६६ धावा, यश जगदाळे ६२, जयेश पोळ २०, टिळक जाधव ३२, नारायण चौधरी १८, ओंकार राजपूत नाबाद १०, नितेश सालेकर ६-५८, प्रज्ञेश बराटे २-५६, अमन मुल्ला १-२८; पहिल्या डावात व्हेरॉक संघाकडे १२७ धावांची आघाडी;

दुसरा डाव : २२ यार्डस : ३३.३ षटकांत सर्वबाद १४० धावा, योगराज देशमुख २७, व्यंकटेश दराडे २०, आर्शीन देशमुख नाबाद २२, रणजित मगर १३, नारायण चौधरी ३-२९, रोहित चौधरी ३-२१, टिळक जाधव २-९ पराभूत वि. व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी : १.३ षटकात २ बाद १४ धावा, ओमकार राजपूत ७, जयेश पोळ नाबाद ६, प्रज्ञेश बराटे १-७, आर्शीन देशमुख १-७; व्हेरॉक संघ ८ गडी राखून विजयी.

Web Title: Warrock Vengsarkar Cricket Academy team's winning opener