शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

लढाईतील योद्धे... कोरोना संकटात पती देशसेवेत अन् पत्नी रुग्णसेवेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 23:54 IST

ऑनफिल्ड ड्युटी : लहान बाळ असतानाही एकही रजा न घेता बजावतात कर्तव्य

ठळक मुद्देकोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक धोकादायक ठरली. त्यामुळे सरकारी रुग्णालयांतील आरोग्यसेवकांना वर्षभरापासून सुटकेचा नि:श्वास घेता आलेला नाही.

हणमंत पाटील

पिंपरी : गेल्या वर्षभरापासून आपण कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करीत आहोत. घरी लहान बाळ असतानाही एकही रजा न घेता अधिपरिचारिका असलेल्या अर्चना खाटमोडे कोरोना योद्ध्या म्हणून रुग्णसेवेत आहेत, तर त्यांचे पती सुशील खाटमोडे हे आर्मीमध्ये अभियंता म्हणून दार्जिलिंग (प. बंगाल) येथे देशसेवेत आहेत. पती-पत्नीच्या प्रामाणिक सेवेच्या निष्ठेला आईवडिलांची साथ व प्रोत्साहन मिळत आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक धोकादायक ठरली. त्यामुळे सरकारी रुग्णालयांतील आरोग्यसेवकांना वर्षभरापासून सुटकेचा नि:श्वास घेता आलेला नाही. चऱ्होली (आळंदी) परिसरात राहणारे सुशील व अर्चना खाटमोडे या दाम्पत्यांना दोन लहान मुले आहेत. पती सुशील हे पश्चिम बंगालमध्ये सीमेवर आणि पत्नी अर्चना रुग्णसेवेत कार्यरत आहेत. त्यामुळे छोट्या मुलांना सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्या आईवडिलांनी घेतली आहे. अर्चना सकाळपासून ते रात्री ११ वाजेपर्यंत आळंदी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असतात. गेल्या वर्षभरात त्यांनी एकही रजा घेतलेली नाही. या दाम्पत्याने देशावरील कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी कर्तव्याला प्राधान्य देऊन रुग्णसेवा आणि देशसेवेला अगदी मनापासून समर्पित केले आहे.

अर्चना म्हणाल्या, “ग्रामीण रुग्णालयात पूर्वीपासून मनुष्यबळ कमी आहे. तरीही रुग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येक कोविड रुग्णाची काळजी घेऊन त्यांच्यावर वेळेत उपचार गरजेचे असतात. रुग्णालयात डॉक्टर रुग्णांचे प्राण वाचवतात. परंतु, उपचारानंतर त्या रुग्णाची सेवाशुश्रूषा करण्याचं काम परिचारिका म्हणून आम्हाला काळजी घ्यावी लागते. उपचारांसोबतच रुग्णाला मानसिक आधार, त्याचं पथ्यपाणी सांभाळणेदेखील तितकेच गरजेचे असते. रुग्ण दाखल झाल्यापासून बरे होऊन घरी जाईपर्यंत आम्हाला दुर्लक्ष करता येत नाही. त्यामुळे आमच्यातील काही सहकारी परिचारिका कोविड पॉझिटिव्ह होऊनही बऱ्या झाल्यानंतर पुन्हा रुग्णांच्या सेवेत येतात. तसेच, आमच्या आळंदी ग्रामीण रुग्णालयातील कोणत्याही वैद्यकीय अधिकाऱ्याने रजा न घेता वर्षभर काम केले. त्यामुळे त्यांना साथ देण्याचे आम्ही कर्तव्य बजावत आहोत. आता कोरोना पॉझिटिव्ह रेट कमी झाल्याचे समाधान वाटत आहे.”

मी दार्जिलिंग येथे आर्मीमध्ये ज्युनिअर अभियंता म्हणून कार्यरत आहे. आम्ही देशसेवा स्वीकारली आहे; परंतु मला माझ्या पत्नीचा अभिमान वाटतो. घरी लहान मुले असतानाही ती एकही रजा न घेता रुग्णांची सेवा करीत आहे.- सुशील खाटमोडे, सीमा सुरक्षा दल, दार्जिलिंग, पश्चिम बंगाल

आपल्या देशावरील कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी आरोग्य विभाग कार्यरत आहे. आमचे वैद्यकीय अधिकारी व सहकारी परिचारिका यांनी एकमेकांना धीर देत आम्ही अखंड रुग्णसेवा करतो. प्रत्येक रुग्ण कोरोनामुक्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी मला माझे कुटुंब, सोसायटी व सहकारी यांची चांगली साथ मिळत आहे.- अर्चना खाटमोडे, अधिपरिचारिका, प्राथमिक आरोग्य रुग्णालय, आळंदी 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलPuneपुणे