शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

वारकऱ्यांच्या ताडपत्रीतही गैरव्यवहार

By admin | Updated: June 16, 2017 04:51 IST

भ्रष्टाचारमुक्ततेचा नारा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सत्तेतही पिंपरी-चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचार होत असल्याचे प्रकरण आज उघडकीस आले. वारकऱ्यांना

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : भ्रष्टाचारमुक्ततेचा नारा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सत्तेतही पिंपरी-चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचार होत असल्याचे प्रकरण आज उघडकीस आले. वारकऱ्यांना भेट म्हणून देण्याच्या ताडपत्रीतही गैरव्यवहार झाला आहे. बाजापेठेत २४०० रुपयांना मिळणारी ताडपत्री ३४१२ रुपयांना खरेदी करून २२ लाखांच्या निविदेत सुमारे साडेसहा लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. दर पृथ:करण आणि निकोप स्पर्धा न करताच निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्याची चौकशी करावी, बाजारभावापेक्षा अधिक दराने खरेदी करून जनतेच्या पैशाची लूट करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्षांनी केली आहे. महापालिकेच्या वतीने आषाढी वारीतील दिंडीप्रमुखांना वस्तू भेट दिली जाते. गेल्या वर्षी विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती खरेदीत गैरव्यवहार केल्याचा कांगावा एका तथाकथित भविष्याचा वेध घेणाऱ्या वर्तमानपत्राने केला होता. त्यास भारतीय जनता पक्षाने हवा दिली होती. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसला कोंडीत पकडून भाजपाने राळ उठविली होती. चौकशी समितीच्या अहवालात कोणत्याही प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार झाला नसून, केवळ अनियमितता झाल्याचे उघड झाले होते. मात्र, हा भावनिक मुद्दा गाजल्याने या मुद्द्यावरून महापालिकेतील सत्ता राष्ट्रवादीला गमवावी लागली होती. भारतीय जनता पक्षाने सत्तेत आल्यानंतर पारदर्शक कारभार करू, असे अभिवचन दिले होते. मात्र, आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या ताडपत्रीत गैरव्यवहार केल्याचा पुरावा राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसेच्या नेत्यांनी माध्यमांसमोर सादर केला.महापालिकेच्या वतीने दिंडीप्रमुखांना वस्तू भेट देण्यात येते. या वर्षी ताडपत्री भेट देण्याचे ठरले. त्यानंतर १०० टक्के वॉटरप्रूफ, नऊ बाय पंधरा अशी १३५ चौरस फूट साईज, कॅनव्हास केमिकल प्रोसेस, आयएसआय मार्किंग असे स्पेसिफिकेशन देण्यात आले होते. एकूण ६५० ताडपत्री घेण्यासाठी पहिली निविदा २६ मे रोजी प्रसिद्ध केली. तिची मुदत सात दिवसांची होती. त्यात एकही ठेकेदार आला नाही. त्यानंतर २ जूनला दुसऱ्यांदा निविदा प्रसिद्ध झाली. त्यात एका जणाने निविदा सादर केली.निविदेत स्पर्धा नाहीत्यानंतर पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. त्या वेळी रेखा इंजिनियरिंग, सिद्धी कॉपीयर्स, एमपी इंजिनियरिंग, धर्मे इंटरप्रायजेस, माणिकचंद हाऊस अशा पाच जणांनी निविदा सादर केल्या. अधिकृत वितरकाचे प्रमाणपत्र नाही, असे सांगून तीन ठेकेदारांना अपात्र ठरविण्यात आले. त्यापैकी सिद्धी कॉपीयर्सने ३४१२ रुपये आणि धर्मे इंटरप्रायजेसने ३६०० रुपये प्रतिताडपत्री असा दर दिला होता. त्यामुळे कमी दराची निविदा म्हणून सिद्धी कॉपीयर्सला काम देण्यात आल्याचे भांडार विभागाने सांगितले. कमी दर देऊनही अपात्रदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेससह, शिवसेना, मनसेने ताडपत्री खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे सिद्ध करण्यासाठी निविदा प्रक्रियेतील एका ठेकेदारालाच माध्यमांसमोर हजर केले. माणिकचंद हाऊसचे संदीप माळी म्हणाले, ‘‘मी तीन वेळा निविदा भरली होती. याबाबत भांडार विभागात विचारायला गेल्यानंतर तेथील अधिकाऱ्यांनी माहिती दिली नाही. टाळाटाळ करीत आहेत. मी संबंधित ताडपत्रीसाठी २४०० रुपये दर दिला होता. मात्र, माझी निविदा मंजूर केली नाही. मला अनामत रक्कमही परत दिली नाही.’’प्रति ताडपत्री एक हजाराचा गैरव्यवहारबाजारात २४०० रुपयांपर्यंत मिळणारी ताडपत्री भाजपाने ३४१२ रुपयांना खरेदी केली आहे. ६५० ताडपत्री खरेदी करण्यात येणार होत्या. वाढीव दरानुसार २२ लाख १७ हजार ८०० रुपये खर्च अपेक्षित होता. २४०० रुपये दर अपेक्षित धरल्यास १५ लाख ६० हजार रुपये खर्च अपेक्षित होता. सुमारे सहा लाख ५७ हजार आठशे रुपयांचा गैरव्यहार झाल्याचे निश्चित झाले आहे.विरोधी पक्षनेते योगेश बहल म्हणाले, ‘‘मूर्ती खरेदीत भ्रष्टाचार झाला नसतानाही भाजपाने कांगावा केला होता. वारकऱ्यांच्या ताडपत्रीत गैरव्यवहार केल्याचा आता जनतेला पुरावाच दिला आहे. निविदाप्रक्रियेत ना निकोप स्पर्धा झाली ना दर पृथक्करण. कुठे गेला पारदर्शक कारभार?’’