शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

‘सावधान’! तुमची फसवणूक होतेय, परदेशातून फोन येतोय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 02:41 IST

बनावट कॉलच्या माध्यमातून होतेय फसवणूक : आफ्रिकन देशांतून येतात फोन

पुणे : मोबाइलच्या पडद्यावर अमेरिका, थायलंड, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका या देशांच्या नावावरून फोन आल्यास मनात एकीकडे कुतूहलाची भावना असली तरी दुसऱ्या बाजुला या कुतूहलाची मोठी किंमत अनेकांना चुकवावी लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून मोबाइलवर आफ्रिका, अमेरिका याबरोबरच काही आखाती देशांमधून मोबाइलवर फोन येण्याचे प्रमाण वाढले आहे. यात विशेष बाब म्हणजे चक्क लँडलाइनवरदेखील अशा प्रकारचे फोन आल्याने नागरिकांनी विशेषत: मोबाइलवर आलेल्या फोनला उत्तर न देणे शहाणपणाचे ठरणार आहे.

कझाकिस्तान, टांझानिया, येमेन, थायलंड, अमेरिका इतकेच नव्हे तर पाकिस्तानमधून मोबाइलवर फोन येण्याचे प्रमाण वाढल्याने अनेकांच्या मनात शंकेचे वातावरण तयार झाले आहे. मोबाइलवर ‘ट्रु कॉलर’ हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर आपल्याला येणाºया फोनची माहिती कळते. मात्र आता बाजारात हॅकिंगच्या अद्यावत सॉफ्टवेअरमुळे हॅकर्सचे काम सोपे झाले आहे. मोबाइलधारकाने मोबाइलवर ट्रु कॉलर डाऊनलोड केल्यानंतर आपल्याबद्दलची माहिती ईमेलद्वारे आपल्याला पाठविली जाते. मेलवर रोज शेकडोच्या संख्येने ‘स्पॅम’च्या नावाखाली फसविणारे मेल येतात. या मेलला उत्तर दिल्यानंतर फोन येणे, किंवा मेलद्वारेच चॅटिंग करून फसवणूक केली जाते. अनेकजण आपल्याला परदेशातून फोन येतो आहे, या उत्साहातून तो फोन घेऊन आपल्याबद्दलची सर्व माहिती फोन करणाºया व्यक्तीला दिल्याने त्यांना हजारो, लाखोंच्या फसवणुकीला सामोरे जावे लागत असल्याच्या कित्येक घटना सायबर विभागाकडे दाखल होत आहेत.याविषयी अधिक माहिती देताना आयटीक्षेत्रात काम करणारे व सायबर अभ्यासक अनुप कवठाई यांनी सांगितले की, किमान सात ते आठ वर्षांपासून नायजेरिया देशांतून मोठ्या प्रमाणावर कॉल येत होते. या देशांमधील काही हॅकर्स इतर देशांमधील लोकांना फोन करून त्यांची फसवणूक करत असे. आता तर अ‍ॅन्ड्रॉइड फोनमुळे हॅकिंग करणे सोपे झाले आहे. ही सिस्टीम सहजासहजी ब्रेक करता येते. यावर उपलब्ध असलेल्या शेकडो अ‍ॅपकरिता मेल आयडीचा अ‍ॅक्सेस घेतला जातो. वाढत्या आणि बदलत्या टेक्नॉलॉजिमुळे जगातून कुठेही, कुणाला फोन करता येणे शक्य झाले आहे. त्यामुळे आपल्याला नायजेरिया किंवा तझाकिस्तानमधून फोन येतो आहे, असे ट्रु कॉलरच्या मदतीने समजले तरी प्रत्यक्षातून कॉल भारतातील एखाद्या राज्यातून केला गेलेला आहे, याची माहिती आपल्याकडे नसते. मात्र कुठल्याही स्वरूपात या कॉलला उत्तर देता कामा नये. उत्तर देण्याच्या निमित्ताने फसवणुकीचे प्रमाण वाढत चालले दिसून येते.तो फोन घेऊच नका...आपल्याला येणारा फोन हा फसवणुकीचा आहे, असे कळल्यावर त्याला उत्तर न देणे हेच शहाणपणाचे आहे. अनेकदा ज्येष्ठांबरोबर तरुणदेखील फोनवरून देण्यात येणाºया माहितीच्या आमिषाला बळी पडतात. त्यामुळे त्यांची लाखोंची फसवणूक होते. सध्या इंटरनेटच्या मदतीने मोठ्या प्रमाणात बनावट सॉफ्टवेअर्स बाजारात उपलब्ध आहेत. ज्यामुळे भारतातून फोन करून तो फोन अमेरिकेतून आल्याचे भासविण्यात येते. मात्र, आपल्या मोबाइलच्या पडद्यावर जर अमेरिकेवरून फोन आला आहे, हे दिसत असतानाही संबंधित व्यक्ती तो फोन का उचलते, हा प्रश्न आहे. सध्या सोशल मीडिया आणि बनावट फोनच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रमाण वाढले असून त्याविषयी नागरिकांनी जागरुक राहण्याची गरज आहे.- जयराम पायगुडे, पोलीस निरीक्षक, सायबर सेल 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी