शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

वारकरी रमले पिठलं-भाकरीच्या पाहुणचारात

By admin | Updated: June 22, 2017 07:19 IST

सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पालखी सोहळा यवत मुक्कामी श्री काळभैरवनाथ मंदिरात विसावला. यवत ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे गावाच्या

लोकमत न्यूज नेटवर्कयवत : सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पालखी सोहळा यवत मुक्कामी श्री काळभैरवनाथ मंदिरात विसावला. यवत ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे गावाच्या वेशीवर जाऊन स्वागत केले. विठ्ठल समाज भजनी मंडळाने पालखी सोहळ्याचे अभंग गात स्वागत केले. यानंतर मंदिरात पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना चुलीवरील भाकरी व पिठल्याचे भोजन देण्यात आले. या वेळी ग्रामस्थांनी तब्बल एक लाख भाकरी व एक हजार किलोचे पिठले असे भोजन वारकऱ्यांना दिले. पिठले भाकरीच्या जेवणाची यवतमधील परंपरा अनेक वर्षे जुनी आहे.पंढरीची दारे आल्यानो संसारा दिनांचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा, भेटीची आवडीकृपाळू तातडी उतावेळा!!या संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या पालखी सोहळ्याने दौंड तालुक्यात प्रवेश केला. लोणी काळभोर येथील मुक्काम आटोपून आज सकाळी पालखी सोहळा मार्गस्थ झाला. पंढरीच्या वाटेतील मोठा टप्पा असलेल्या लोणी ते यवत दरम्यान जवळपास २८ किलोमीटर अंतराचा टप्पा पालखी सोहळ्याने ज्ञानोबा - तुकाराम जयघोष करीत पार केला.हवेली तालुक्यातून दौंड तालुक्यात पालखी सोहळा प्रवेश करताना दौंडचे आमदार राहुल कुल, माजी आमदार रंजना कुल, सभापती मीना धायगुडे, उपसभापती सुशांत दरेकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा वैशाली आबणे, महानंदाच्या माजी अध्यक्षा वैशाली नागवडे, प्रांत अधिकारी संजय असावले, तहसीलदार विवेक साळुंखे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश मोरे, पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, आप्पासाहेब पवार, तात्यासाहेब ताम्हाणे, तानाजी दिवेकर, पोपटराव ताकवणे, बोरिभडकच्या सरपंच कमल कोळपे, डॉ. अशोक रासगे, माऊली ताकवणे, सुरेश शेळके, गणेश कदम, नितीन दोरगे उपस्थित होते. पुणे-सोलापूर महामार्गावर सहजपुर फाटा, जावजी बुवाची वाडी, खामगाव फाटा, कासुर्डी फाटा येथे पालखीचे स्वागत करण्यात आले. जावजी बुवाची वाडी येथे पालखी अर्धा तास विश्रांती साठी थांबली होती. सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पालखी सोहळा यवत मुक्कामी श्री काळभैरवनाथ मंदिरात विसावला. यानंतर आरती करण्यात आली.तत्पूर्वी यवत येथे गावाच्या वेशीवर सरपंच राजिया तांबोळी, उपसरपंच समीर दोरगे, जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम, पंचायत समिती सदस्या निशा शेंडगे, भीमा पाटस कारखान्याचे ज्येष्ठ संचालक सुरेश शेळके, नानासाहेब दोरगे, माजी उपसरपंच सदानंद दोरगे, सुभाष यादव, प्रकाश दोरगे, दशरथ खुटवड, शंकर दोरगे, कैलास दोरगे, दत्तोबा दोरगे, यांच्यासह ग्रामस्थांनी पालखी सोहक्याचे स्वागत केले.