शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर; अंतिम ४ सप्टेंबरला जाहीर होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 20:38 IST

महापालिकांच्या निवडणुका या दिवाळीनंतर म्हणजेच ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता

पुणे : राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने आगामी महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे वेळापत्रक कार्यक्रम गुरुवारी जाहीर केले आहे. यामध्ये २२ जुलै रोजी प्रारुप तर ४ सप्टेंबर रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य शासनाने मंगळवारी राज्यातील २९ महापालिकांना आगामी निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश काढले. यानंतर नगर विकास विभागाने गुरुवारी चार सदस्यीय प्रभाग रचना तयार करण्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार ११ ते १६ जून दरम्यान प्रगणक गटाची मांडणी करणे, प्रारूप प्रभाग रचना तयार करणे, १७ आणि १८ जून जनगणनेची प्राप्त माहिती तपासणी करणे, १९ ते २३ जून स्थळ पाहणी करणे, २४ ते ३० जून गुगल मॅप वर प्रभागाचे नकाशे तयार करणे, ०१ ते ०३ जुलै नकाशात निश्चित केलेल्या प्रभागातील जागेवर जाऊन तपासणी करणे. ०४ ते ०७ जुलै प्रारूप प्रभाग रचनेच्या मसुद्यावर समितीने स्वाक्षऱ्या करणे, ०८ ते १० जुलै दरम्यान प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगास पाठविणे, त्यास राज्य निवडणूक आयोग अथवा आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता देणे, २२ जुलै रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे, ३१ जुलैपर्यंत प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती सूचना मागविणे, ०१ ते ११ ऑगस्ट प्राप्त हरकती सूचनांवर सुनावणी घेणे, १२ ते १८ ऑगस्ट दरम्यान हरकती व सूचनांवरील शिफारसी विचारात घेऊन प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना निवडणूक आयोगास पाठविणे. प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेल्या प्रभाग रचनेच्या शिफारशींवर निवडणूक आयुक्त यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना संबंधित महापालिका आयुक्तांना कळविणे, २९ ऑगस्ट ते ०४ सप्टेंबर राज्य निवडणूक आयुक्त यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करणे.

राज्य सरकारने तयार केलेल्या वेळापत्रकानुसार ४ सप्टेंबर पर्यंत प्रभागांची रचना जाहीर होणार आहे. ही अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर निवडणुकीसाठी आरक्षण सोडत होईल. त्यानंतर कधीही महापालिकांच्या निवडणुका होऊ शकतात. शालेय विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षा या शक्यतो दिवाळीपूर्वी असतात. त्यामुळे निवडणूक घ्यायची झाल्यास मतदान केंद्र, मतदान अधिकारी म्हणून शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना ड्युटी लावणे अडचणीचे होणार आहे. त्यामुळे महापालिकांच्या निवडणुका या दिवाळीनंतर म्हणजेच ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

- ११ ते १६ जून प्रगणक गटाची मांडणी करणे- १६ ते १८ जून प्रगणक माहिती तपासणे- २२ ते ३१ जुलै प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे- १ ते ११ ऑगस्ट हरकती, सूचनांवर सुनावणी घेणे- १२ ते १८ ऑगस्ट प्रभाग रचना आयोगाला पाठविणे- २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर अंतिम प्रभाग रचना जाहीर करणे

टॅग्स :PuneपुणेMuncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूक 2024Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगPoliticsराजकारण