शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

वारकरी आजही पत्राद्वारे कळवतोय खुशाली, टपाल खात्याची विशेष सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 02:39 IST

घरोघरी आणि हातोहाती मोबाइल आल्यानंतर पत्रव्यवहार करणाऱ्यांची संख्या अत्यल्प झाली आहे. व्हॉट्सअ‍ॅपसारख्या अ‍ॅप्लिकेशनमुळे मेसेज आणि आॅनलाइन बँकिंगमुळे पैसे काही क्षणांत एकमेकांना पाठवणे शक्य होते.

पुणे - घरोघरी आणि हातोहाती मोबाइल आल्यानंतर पत्रव्यवहार करणाऱ्यांची संख्या अत्यल्प झाली आहे. व्हॉट्सअ‍ॅपसारख्या अ‍ॅप्लिकेशनमुळे मेसेज आणि आॅनलाइन बँकिंगमुळे पैसे काही क्षणांत एकमेकांना पाठवणे शक्य होते. असे असताना आजही टपाल खात्याकडून वारीत सहभागी झालेल्या वारकºयांसाठी टपालाची सेवा पुरविली जात आहे.पुणे पोस्टल रिजनच्या समन्वयाने गेल्या तीन वर्षांपासून खास वारकºयांसाठी ही सुविधा पुरविण्यात येत आहे. विशेष म्हणजे मोबाइलच्या जमान्यात देखील सध्या अनेक वारकरी या सेवेचा लाभ घेत आहेत. पोस्टाची ही सेवा केवळ पत्रांपुरती मर्यादित नसून मनीआॅर्डरदेखील स्वीकारण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांत ५८७ वारकºयांनी या सुविधेचा वापर केला. तर एकूण २२ हजार ९२४ रुपयांचे स्टॅम्प विकले गेले आहेत, अशी माहिती टपाल विभागाकडून देण्यात आली. वारकºयांची खुशाली कुटुंबीयांपर्यंत पोहोचावी म्हणून पोस्टाची एक गाडी दिंडीसोबत असते. एक चालक आणि दोन कर्मचारी अशी तिघांची टीम त्यासाठी २४ तास कार्यरत आहे. त्यांच्याकडे टपालाचे तिकीट आणि पत्रांसाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वारकºयांना पत्र पाठवायचे असेल तर त्यांनी या कर्मचाºयांशी संपर्क साधायचा. योग्य ते तिकीट खरेदी करायचे आणि पत्ता टाकून पत्र कर्मचाºयांकडे जमा करायचे. एखाद्या वारकºयाला लिहिता-वाचता येत नसेल तर पोस्टाचे कर्मचारी त्यांना पत्रदेखील लिहून देतात.जमा झालेली सर्व पत्रे जवळच्या टपाल कार्यालयात जमा करण्यात येतात. त्यानंतर पत्रांचा इच्छित स्थिळी जाण्याचा प्रवास सुरू होतो. पत्रासाठी ५० पैशांची पोस्टकार्ड, आंतरदेशीय पत्र, तिकिटे उपलब्ध आहेत.तर मनीआॅर्डर प्राप्त करण्यासाठी कोणतेही कमिशन नाही.विशेष म्हणजे या सेवेसाठी वेगळा किंवा जास्त दरदेखील ठेवण्यात आलेला नाही. वारीत सहभागी होत असलेल्यांमध्ये वृद्धांची संख्या मोठी आहे. त्यातील सर्वांकडेच मोबाइल नाही, तर काही वारकरी सुरक्षेच्या दृष्टीने मोबाइल आणत नाही. त्यामुळे ते पूर्वीप्रमाणे पत्राच्या माध्यमातून घरच्यांना त्यांची खुशाली कळवतात.वारीसाठी खास पोस्टकार्डवारीतून पाठविण्यात आलेले पत्र अनोखे असावे म्हणून विभागाने वारीसाठी खास पोस्टकार्डदेखील तयार केले आहे. त्यावरसंतांची चित्रे प्रसिद्ध करण्यातआली आहेत.त्यामुळे वारकरीदेखील याच कार्डला पसंती देताना दिसतआहे. १० रुपयांना असणारेहे कार्ड अनेकांना आकर्षितकरीत आहे.

टॅग्स :PuneपुणेPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा