शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

आंबेगाव खुर्द ते वाघोली रिंगरोडचे काम लवकरच : पीएमआरडीए; ६५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 12:08 IST

पीएमआरडीएने पहिल्या टप्प्यात पुणे-सातारा महामार्ग ते नगर महामार्ग यांना जोडणारा रिंग रोड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सुमारे ६५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.

ठळक मुद्देएकूण रिंग रोड असणार १२३ किमी लांबीचा; राबविले जाणार टीपी स्किमचे मॉडेल पहिल्या टप्प्यात पुणे- सातारा महामार्ग ते पुणे-नगर महामार्ग जोडण्याचा निर्णय

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पहिल्या टप्प्यात पुणे-सातारा महामार्ग ते नगर महामार्ग यांना जोडणारा रिंग रोड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ‘आंबेगाव खुर्द ते वाघोली’ या ३३ किमी लांबीचा रिंग रोड विकसित केला जाणार आहे. येत्या दोन महिन्यांत निविदा काढली जाणार असून, यासाठी सुमारे ६५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते यांनी पत्रकार परिषदेत दिली.याबाबत गित्ते यांनी सांगितले की, पीएमआरडीएने प्रादेशिक विकास आराखड्यातील रिंग रोड विकसित करण्याचा निर्णय घेतला. एकूण रिंग रोड हा १२३ किमी लांबीचा असणार आहे. या रिंग रोडसाठी टीपी स्किमचे मॉडेल राबविले जाणार आहे. हा रिंग रोड १० पदरी असणार आहे. प्राधिकरणाने पहिल्या टप्प्यात पुणे- सातारा महामार्ग ते पुणे-नगर महामार्ग जोडण्याचा निर्णय घेतला आहे. आंबेगाव खुर्द-मांगडेवाडी - पिसोळी -वडाचीवाडी- हांडेवाडी- होळकरवाडी- वडकी - उरुळी देवाची- कदमवाकवस्ती-मांजरी खुर्द-आव्हाळवाडी-वाघोली असा रिंग रोडचा मार्ग असणार आहे. सुमारे ३३ किमी लांबीचा रिंगरोड विकसित केला जाणार आहे. आंबेगाव खुर्द ते वाघोली या रिंग रोडसाठी निविदा प्रकिया राबविली जाणार आहे. दोन महिन्यांत या रस्त्यासाठीची निविदा अंतिम केली जाणार आहे. यासाठी सुमारे ६५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. १० पदरी असलेल्या रिंग रोडमध्ये सुरुवातीला सर्व्हिस रोड पहिल्यांदा केला जाणार आहे. सर्व्हिस रोड हा चार लेनचा केला जाणार आहे. त्यानंतर उर्वरित लेन केल्या जाणार आहेत. या ३३ किमी लांबीच्या रस्त्यामध्ये आंबेगाव खुर्द येथे एक बोगदा, मांगडेवाडी येथे दोन बोगदे आणि येवलेवाडी येथे एक बोगदा असणार आहे. पुणे-जेजुरी रेल्वे मार्ग आणि पुणे दौंड रेल्वे मार्ग, असे दोन पूल असणार आहे, तर मुळा-मुठा नदीवर एक पूल असणार आहे. त्याचबरोबर या रिंग रोडला जोडणारे तब्बल ४२ रस्तेही प्राधिकरणाकडून विकसित केले जाणार आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे आयुक्त गित्ते यांनी दिली. 

पहिल्या टप्प्यात असा असेल रिंगरोडसातार रस्ता येथील आंबेगाव खुर्द-मांगडेवाडी - पिसोळी -वडाचीवाडी- हांडेवाडी- होळकरवाडी- वडकी - उरुळी देवाची- कदमवाकवस्ती-मांजरी खुर्द-आव्हाळवाडी-वाघोली, असा रिंग रोडचा मार्ग असणार आहे. 

जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात असलेली एकूण १ हजार २७८ हेक्टर शासकीय जमीन पीएमआरडीएला हस्तांतरित करण्यासाठीचा प्रस्ताव दिला आहे. जमिनीच्या बदल्यात जमीन या तत्त्वानुसार जमीन संपादित केली जाईल. त्याचे मूल्यांकन करण्याचे काम पूर्ण झाले असून, आगामी दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल.- किरण गित्ते, महानगर आयुक्त, पीएमआरडीए

टॅग्स :Puneपुणे