शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 03:29 IST

शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतच असून, सकाळी फिरायला जाणाऱ्या, घराबाहेर, सोसायटी खेळणाऱ्या मुलं, रात्री उशिरा दुचाकीवर असलेल्या नागरिकांवर या भटक्या कुत्र्यांकडून होणार हल्ले वाढले आहेत

पुणे : शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतच असून, सकाळी फिरायला जाणाऱ्या, घराबाहेर, सोसायटी खेळणाऱ्या मुलं, रात्री उशिरा दुचाकीवर असलेल्या नागरिकांवर या भटक्या कुत्र्यांकडून होणार हल्ले वाढले आहेत; तसेच काही भागात टोळीने राहणारी ही भटकी कुत्री रात्रीच्या वेळी प्रचंड मोठ्या व विचित्र आवाजात विव्हळल्याने नागरिकांच्या झोपेचे वांदे झाले आहे.शहराचा वाढता विस्तार, रस्त्यावर टाकाला जाणार कचरा, या भटक्या कुत्र्यांवर प्रेम करून त्यांना खाऊ घालणारे नागरिक यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. महापालिकेच्या वतीने सन २००७ मध्ये शहरातील भटक्या कुत्र्यांची गणना करण्यात आली. त्या वेळी संपूर्ण पुणे शहरामध्ये ४० हजार भटकी कुत्री असल्याचे स्पष्ट झाले होते. आता ही संख्या तब्बल दीड ते दोन लाखांच्या घरात गेली असल्याचे महपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी महापालिकेच्या वतीने नियमितपणे या कुत्र्यांची नसबंदी करण्यात येते; परंतु भटक्या कुत्र्यांची प्रचंड संख्या लक्षात घेता, या उपाय-योजना खूपच अपूर्ण पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून, गेल्या काही दिवसांत या भटक्या कुत्र्यांमुळे पुणेकर नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. भटक्या कुत्र्यांकडून चावा घेण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. बिबवेवाडीतील महेश सोसायटी परिसरात काही मुले खेळत असताना, एका भटक्या कुत्र्याने लहान मुलाला चावा घेतला. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वाढले आहे. येरवडा परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी भटक्या कुत्र्यांच्या टोळीने रात्री मोटारसायकलवरून येणाºया एक व्यक्तीवर हल्ला केल्याची देखील घटना घटली आहे. तसेच गोखलेनगर, सिंहगड रोड भागात कुत्र्यांच्या विव्हळल्याने नागरिकांच्या झोपा उडाल्याआहेत.रात्री भटक्या कुत्र्यांच्या विव्हळल्याने झोपेचे वांदेगोखलेनगर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांत भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. फिरायला जाणारे, रात्री उशिरा दुचाकीवर असलेल्या नागरिकांवर तर ही भटकी कुत्री हल्ले करतातच; पण गेल्या काही दिवसांपासून टोळीने राहणारे ही भटकी कुत्री प्रचंड विचित्र आवाजामध्ये रात्रीच्या वेळी विव्हळतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या झोपा उडाल्या आहेत. - सुगंधा गोळे, त्रस्त नागरिक, गोखलेनगरमहिन्याला सरासरी ९०० पेक्षा अधिक नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा चावासकाळी फिरायला जाणाºया, रात्री उशिरा दुचाकीवर असलेल्या नागरिकांवर भटक्या कुत्र्यांकडून हल्ले नवीन नाहीत; परंतु आता या कुत्र्यांकडून सोसायट्यांच्या परिसरामध्येदेखील हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे भटक्या कुत्र्यांकडून पुणेकरांमध्ये दहशत निर्माण होऊ लागली आहे. सध्या शहरामध्ये महिन्याला सरासरी तब्बल ९०० पेक्षा अधिक पुणेकरांना भटकी कुत्री चावा घेत असल्याची धक्कादायक माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.वर्षभरात ९,२२२ कुत्र्यांची नसबंदीमहापालिकेच्या वतीने भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून नसबंदी केली जाते. यासाठी शहरामध्ये महापालिकेच्या वतीने स्वतंत्र यंत्रणा तयार केली असून, खासगी संस्थेच्या मदतीने ही नसबंदी केली जाते. सध्या दररोज ८० ते ८५ कुत्र्यांची नसबंदी केली जात असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाºयांनी सांगितले. यामुळे गेल्या एक वर्षामध्ये शहरात सुमारे ९ हजार २२२ कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली आहे.

टॅग्स :dogकुत्राPuneपुणे