शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

पराभवाला वळसे पाटील हेच जबाबदार : आढळराव पाटील यांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 14:36 IST

‘‘अभिनेत्याच्या प्रतिमेचा व मालिकेचा प्रभाव; तसेच जातीचे राजकारण यामुळे लोकसभेला पराभव झाला.

ठळक मुद्देआंबेगाववर भगवा फडकविण्यासाठी सज्ज रहाकार्यकर्त्यांनी पराभव विसरून पुन्हा कामाला लागावेसहाही मतदार संघांत अगदी भाजप उमेदवारांचाही मी ठासून प्रचार करणार

मंचर  : ‘‘अभिनेत्याच्या प्रतिमेचा व मालिकेचा प्रभाव; तसेच जातीचे राजकारण यामुळे लोकसभेला पराभव झाला. या पराभवाला डॉ. कोल्हे जबाबदार नसून वळसे पाटील हेच प्रामुख्याने जबाबदार आहेत. पराभवाने खचून न जाता आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे.  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांसारखे दिग्गज नेते निवडणुकीत पराभूत होतात. मग वळसे पाटील का पराभूत होणार नाही, आंबेगाव विधानसभेवर भगवा फडकविण्यासाठी सज्ज राहा,’’ असे आवाहन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रथमच लांडेवाडी येथे येऊन आढळराव पाटील यांनी जनता दरबारात कार्यकर्ते व नागरिकांच्या भावना समजावून घेतल्या. यावेळी झालेल्या मेळाव्यात ते म्हणाले,देशात मोदी लाट असताना शिरूरमधील पराभवाचे अनेकांना वाईट वाटले, तर काहींना आत्ताच पश्चाताप होतोय. १५ वर्षे जे बरोबर राहिले ज्यांनी साथ दिली, त्यांचे आभार मानत एका पराभवाने घरी बसणे शहाणपणाचे नव्हते. त्यामुळे मतदार संघात राष्ट्रवादीची गुंडगिरी व दहशत वाढली असती. म्हणून पुन्हा कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करण्यासाठी आलो आहे. एका व्यक्तीच्या प्रतिमेचा, मालिकेचा प्रभाव व जातीच्या समीकरणामुळे निवडणुकीत पराभव झाला. मालिका पाहणाऱ्या महिलांनी राजाला मतदान करायचे, असे म्हणत समोरच्या उमेदवाराला मतदान केले. त्यामुळे वैयक्तिक कोणाला दोष देण्यात अर्थ नाही. यापूर्वीही मी थांबलो नाही व आताही थांबणार नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संदेश पाठवून सरकार तुमच्या पाठीशी असून कामांना प्राधान्य राहील, असे आश्वासन दिले आहे. आमदार सुरेश गोरे म्हणाले, की आढळराव पाटील यांचा या निवडणुकीत नैतिक विजय झाला आहे. मतदारांनी विकासापेक्षा प्रतिमेला महत्त्व दिले. कार्यकर्त्यांनी पराभव विसरून पुन्हा कामाला लागावे, दादा पुन्हा खासदार होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  ...........निवडणुकीत बैलगाडा, विमानतळ, वाहतूककोंडी हे प्रश्न बाजूला पडून केवळ जातीय समीकरणे व मालिका हा फॅक्टर चालला. यात माळी समाजाला दोष देऊन उपयोग नाही. ही पाच वर्षे अशी निघून जातील.४ महिन्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे कार्यकर्त्यांनी लक्ष केंद्रित करावे. सहाही मतदार संघांत अगदी भाजप उमेदवारांचाही मी ठासून प्रचार करणार आहे.       - शिवाजीराव आढळराव पाटील........४जनता दरबार सुरू असताना काही कार्यकर्त्यांनी पदाधिकाºयांबाबत तक्रार केली. निवडणुकीत त्यांनी चांगले काम केले नसल्याने पराभव झाला, असे कार्यकर्ते सांगत होते. हा मुद्दा आढळराव पाटील यांनी खोडून काढला. मागील ३ निवडणुकांमध्ये जसे कार्यकर्ते काम करत होते, तसेच त्यांनी यावेळी केले आहे. ४त्यांना दोष देऊन उपयोग नाही. समोर अभिनेता उमेदवार असल्याने पराभव झाला आहे. इतरांवर दोष देण्यापेक्षा यापुढील काळात येणाºया विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्याची सूचना आढळराव पाटील यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेShivajirao Adhalraoशिवाजीराव आढळरावDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल