शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

Suresh Dhas: वाल्मीक कराडकडे १७ सिम कार्ड; आरोप करत सुरेश धस बीडच्या SPना म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 16:34 IST

अशी मंत्रि‍पदे आम्ही कोणावरही ओवाळून टाकू. तुम्ही संतोष देशमुखला माघारी आणून देता का? असा सवाल सुरेश धस यांनी विचारला आहे.

Suresh Dhas Pune Speech: "वाल्मीक कराड आणि त्याचा सहकारी नितीन कुलकर्णी हे १७ मोबाईल नंबर वापरतात. वाल्मीक कराड शरण आल्यापासून नितीन कुलकर्णी फरार झाला आहे. पण माझी बीडच्या पोलीस अधीक्षकांना आणि सीआयडच्या डीजींना विनंती आहे की या नितीन कुलकर्णीला ताब्यात घ्या. कोणा-कोणाकडून किती पैसे घेतले आहेत ते तुम्हाला या १७ मोबाईल नंबरच्या तपासणीत सापडेल," असं आवाहन भाजप आमदार सुरेश धस यांनी पोलीस प्रशासनाला केलं आहे. ते पुण्यातील आक्रोश मोर्चात बोलत होते.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मंत्रि‍पदासाठी सुरेश धस राजकीय आरोप करत असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे समर्थकांकडून केला जातो. यावर बोलताना सुरेश धस म्हणाले की, "मंत्रि‍पदाचा काय संबंध? अशी मंत्रि‍पदे आम्ही कोणावरही ओवाळून टाकू. तुम्ही संतोष देशमुखला माघारी आणून देता का? त्याला माघारी आणून देणार असाल तर मी राजकारण सोडतो आणि तुम्ही सांगितलं तर कझागिस्तान किंवा गामा देशात जातो. देणार का माघारी आणून संतोषला?" असा संतप्त सवालही धस यांनी विचारला आहे.

"माझा हेतू काय आहे? मी दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर माझा बाप गेला होता. त्यानंतर सहा महिने मला तेल, मीठ, मिर्ची कशी आणतात हे कळत नव्हतं. संतोष देशमुखांच्या १०वीतील लेकराला आता कोणाचा आधार आहे? यात राजकारण कसलं आणलं? देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, हा माझा हेतू आहे," अशा शब्दांत आमदार सुरेश धस यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे. 

टॅग्स :Suresh Dhasसुरेश धसwalmik karadवाल्मीक कराडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणBeedबीडPuneपुणे