शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वालचंदनगर पोलीस ठाणे : भाड्याच्या खोलीतून कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 02:44 IST

वालचंदनगर पोलीस ठाण्याला स्वत:च्या मालकीची इमारत नसल्याने गेल्या २८ वर्षांपासून भाड्याच्या खोल्यांत कामकाज सुरू आहे. प्रतिमहिना ६ खोल्या ३० रुपये भाडेकराराने घेतल्या आहेत.

वालचंदनगर  - वालचंदनगर पोलीस ठाण्याला स्वत:च्या मालकीची इमारत नसल्याने गेल्या २८ वर्षांपासून भाड्याच्या खोल्यांत कामकाज सुरू आहे. प्रतिमहिना ६ खोल्या ३० रुपये भाडेकराराने घेतल्या आहेत. खोल्यांचे आयुर्मान संपले असल्याने धोकादायक इमारतीत कामकाज करण्याची वेळ येथील पोलीस कर्मचाऱ्यांवर आली आहे.छतावरील पत्रे कुजलेले व पावसाळ्यात गळत असतात. पोलिसांवर तुटके पत्रे जुळवून संसार मांडण्याची वेळ आली आहे. गेल्या १० वर्षांपूर्वी शासनाने पोलीस ठाण्याला हक्काची इमारत व पोलीस कर्मचाºयांना राहण्यासाठी सुनियोजित जागेसाठी ८० लाख भरून ५ एकर जागा घेतली आहे. परंतु, शासकीय निधी मिळत नसल्याने आजही येथील कर्मचाºयांना पोलीस ठाण्याला व कर्मचाºयांना भाड्याच्या खोल्यांतच दिवस काढण्याची वेळ आलेली आहे. वालचंदनगर पोलीस ठाण्यास शासकीय निधी उपलब्ध झाल्यास कर्मचारी व पोलीस ठाण्याच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लागेल.इंदापूर तालुक्यात सर्वात जास्तीची लोकसंख्या असलेले जवळजवळ ४२ गाव वाड्या-वस्त्या असलेले हे पोलीस ठाणे कामकाज पाहत आहे. या पोलीस ठाण्यात ४० कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु स्वत:च्या मालकीची हक्काची इमारत नसल्यामुळे नाइलाजास्तव पोलीस कर्मचाºयांना बाहेरगावी भाड्याने राहण्यासाठी जावे लागत आहे. दुर्दैवाने अनुचित प्रकार घडल्यास कर्मचाºयांना येण्यासाठी १ तासाचा कालावधी लागतोे. त्यामुळे परिसरातच कर्मचाºयांना वसाहत उपलब्ध करून दिल्यास होणाºया घटना टाळण्यास वेळ लागणार नाही. कर्मचाºयांच्या कुटुंबातील मुलांच्या भवितव्यासाठी शैक्षणिक सुविधा वालचंदनगर शहरात उपलब्ध आहेत. मात्र, नाईलाजाने कर्मचाºयांना बाहेर राहावे लागत आहे. वसाहती नसल्याने पोलीस कर्मचाºयांच्या कुटुंबीयांनादेखील गैरसोयीचे ठरत आहे.येथील पोलीस ठाण्याच्या सर्वसोयींनीयुक्त व वसाहतीसाठी शासनाने जवळजवळ ५ एकर जमिनीवर वसाहत व भव्य इमारत उभारणी करण्यासाठी ८० लाख महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाकडे वर्ग करण्यात आलेले आहे. आज तारखेला पोलीस ठाण्याच्या नावाने ७/१२ निघत असूनही शासकीय निधीअभावी विलंब होताना दिसत आहे.वालचंदनगर पोलीस ठाणे येथील प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की या पोलीस ठाण्याला इमारत व वसाहत मिळण्यासाठी सतत पाठपुरावा चालू आहे. वरिष्ठ स्तरावरून पाठपुरावा करून ५ एकर जमीन अंथुर्णे हद्दीत शेती महामंडळाकडून देण्यात आली आहे. या पाच एकरला पहिल्यांदा संरक्षक भिंत बांधून घेण्यात येणार आहे. तालुक्यात पहिल्यांदा एका वेळी दोन ठिकाणी निधी मिळणे कठीण असल्याने इंदापूर येथील वसाहत व इमारतीचे नियोजन झालेले आहे. नंतर वरील स्तरावरून निधी उपलब्ध झाल्यास वालचंदनगर येथील प्रलंबित असलेली नियोजित इमारत होण्यास वेळ लागणार नाही. त्यासाठी प्रस्ताव पाठवणार असल्याचे भजनावळे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPolice Stationपोलीस ठाणे