शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिक्षा आता संपली, गणरायाची स्वारी आली...! प्राणप्रतिष्ठापनेसाठी दुपारी दीडपर्यंत उत्तम मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 20:54 IST

गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांकडून पार्थिव गणेश मूर्तीची स्थापना व पूजन केले जाणार आहे.

ठळक मुद्देघरातील मूर्ती सुमारे एक वीत म्हणजे ७/८ इंच उंचीची असावीयंदाचा गणेशोत्सव हा अकरा दिवसांचा मानाच्या पाचही गणपतींची प्राणप्रतिष्ठा दुपारी बारापर्यंत होणार

पुणे : रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट, सुगंधी - धुप अगरबत्यांचा दरवळ, मंगलमयी वाद्यांची सुरावट आणि लक्ष वेधून घेणारी आरास अशा प्रसन्नशील चैतन्यदायी वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. याकरिता अवघी पुण्यनगरी तयार झाली असून प्रत्येकाला बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठेचे वेध लागले आहेत. शहरातील प्रमुख मंडळाची तयारी पूर्ण झाली असून अनेकांकडून अखेरचा हात फिरविण्याचे काम सुरु होते. कार्यकर्त्यांनी उरलेल्या कामे पूर्णत्वाला नेण्याकरिता वेगाने काम सुरु केल्याचे दृश्य बुधवारी पाहवयास मिळाले.     श्री कसबा गणपती मंडळ, श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ, श्री गुरुजी तालीम मंडळ, श्री तुळशी बाग मंडळ व केसरीवाडा गणेशोत्सव या मानाच्या पाचही गणपतींची प्राणप्रतिष्ठा दुपारी बारापर्यंत होणार आहे. यानंतर शहरातील प्रमुख गणेशमंडळांच्या मिरवणूकांना सुरुवात होणार आहे. आकर्षक,सुंदर फुलांनी सजवलेले रथ, त्यात केलेली सजावट , श्रींकरिता तयार केलेले मखर, याशिवाय ढोल, लेझीम झांज पथकांच्या समवेत निघणा-या मिरवणूका गणेशभक्तांच्या उत्सुकतेचा विषय बनला आहे. छत्रपती राजाराम मंडळाच्या मिरवणूकीला दुपारी चार वाजता सुरुवात होणार असून त्यांनी श्रींच्या मिरवणूकीकरिता लक्ष्मी रथाची निर्मिती केली आहे. वाद्यवृंद ढोलपथकाचे वादन होणार असून सायंकाळी सात वाजता पालकमंत्री गिरीश बापट व सभापती रामराजे निंबाळकर यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर यांनी सांगितले. हुतात्मा बाबु गेनु मंडळाच्या श्रींच्या मिरवणूकीला सकाळी नऊ वाजता सुरुवात होणार असून साडेअकरा वाजता प्राणप्रतिष्ठा होणार आहे. फुलांची आकर्षक सजावट असलेला रथ मिरवणूकीचे वेगळेपण असणार आहे. बाबु गेनु चौकापासून मिरवणूकीला सुरुवात होणार असून पुढे मंडई, शनिपार चौक, लक्ष्मी रस्ता, गुरुजी तालीम बेलबाग, रामेश्वर चौकातून श्रींची मिरवणूक पुन्हा नियोजित स्थळी येणार आहे.  

* खरेदी आटोपली, सजावट झाली...बाजारपेठांमधील खरेदीकरिता गर्दी बुधवारी कायम होती. अनेकांनी वाहतूक कोंडी टाळण्याकरिता उत्सवाच्या आदल्यादिवशीच श्रींची मुर्ती घरी घेवून जाण्यास पसंती दिली. उत्सुकता, उत्साह, आतुरतेचे वातावरण उत्सवाच्या पूर्वेसंध्येला पाहवयास मिळाला. वादनाकरिता तयार असलेली ढोलपथके, लेझीमपथके, झांजपथके यांची तयारी पूर्ण होवून आता वादकांना गणरायाच्या स्वारीचे वेध लागले आहेत. सुख, शांती,समृध्दी आणि मांगल्याचे प्रतिक असलेल्या विघ्नहर्ता श्रीगणेशाचे उद्या ( गुरूवारी) भाद्रपद शुद्ध चतुर्थीला म्हणजेच गणेश चतुर्थी आगमन होत आहे. गणरायाच्या स्वागतासाठी अवघी पुण्यनगरी सज्ज झाली असून, घरोघरी व गणेशमंडळांच्या सजावटीच्या तयारीने वेग घेतला आहे. यंदाचा गणेशोत्सव हा अकरा दिवसांचा आहे. गणेश चतुर्थीला पहाटे ब्राह्म मुहूर्तापासून दुपारी दीड वाजेपर्यंत श्रीगणेशाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी उत्तम मुहूर्त असल्याची माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली.  गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांकडून पार्थिव गणेश मूर्तीची स्थापना व पूजन केले जाणार आहे. या दिवशी सूर्योदयापासून दुपारी २:५२ पर्यंत भद्रा आहे. श्रीगणेश स्थापनेसाठी भद्रा दोष मानू नये. पहाटेपासून ते दीड वाजेपर्यंत आपल्या आणि गुरूजींच्या सोयीनुसार कोणत्याही वेळी मंगलमूर्ती मोरया... च्या जयघोषात घरातील श्रीगणेशाची स्थापना करून पूजन करावे. आपल्या घरी जितके दिवस उत्सव असेल तितके दिवस सकाळी पूजा व रात्री आरती मंत्रपुष्प केल्याने घरामध्ये प्रसन्नता येते, घरातील मूर्ती सुमारे एक वीत म्हणजे ७/८ इंच उंचीची असावी, ही मूर्ती आसनस्थ आणि सुबक असावी तसेच मातीची अथवा शाडूची असावी, असे दाते म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८