शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आॅक्टोबर बॅकलॉग परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा, पालक-विद्यार्थी चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 00:33 IST

महाविद्यालयाने आॅक्टोबर बॅकलॉग परीक्षा २०१८चा निकाल अद्याप न लावता पुन्हा एकदा विद्यापीठाच्या नियमांची पायमल्ली केल्याचे उघड झाले आहे.

उरुळी कांचन : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी सलग्नता असलेल्या उरुळी कांचन येथील महात्मा गांधी सर्वोदय संघ संचालित पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई महाविद्यालयाने आॅक्टोबर बॅकलॉग परीक्षा २०१८चा निकाल अद्याप न लावता पुन्हा एकदा विद्यापीठाच्या नियमांची पायमल्ली केल्याचे उघड झाले आहे. याला प्रशासनाची ढिलाई म्हणायचे की संस्थाचालकांचे दुर्लक्ष? असा सवाल संतप्त पालकांनी उपस्थित केला आहे.या कॉलेजने आॅक्टोबर बॅकलॉग परीक्षेचा निकाल अद्याप लावलेला नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे मागील वर्षी काही विषय राहिले होते, ते सुटले किंवा नाही, याचा काहीच तपास विद्यार्थी किंवा त्यांचे पालक यांना लागेना. पण, कॉलेज प्रशासन मात्र मूग गिळून गप्प असल्याचे चित्र या कॉलेजमध्ये दिसून येत आहे. येथील पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई महाविद्यालयाने ५ आॅक्टोबर २०१८ ते २६ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत प्रथम वर्ष बीएसस्सी, बीए व बीकॉम या वर्गांच्या आॅक्टोबर बॅकलॉग परीक्षा घेतल्या असून, त्या परीक्षा घेऊन सुमारे २ महिने म्हणजे ६० दिवस उलटूनही निकाल अद्याप जाहीर केलेला नाही.ही बाब अत्यंत गंभीर असून विद्यापीठ प्रशासनाने यावर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील पालकांनी केली आहे.वास्तविक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ११ जानेवारी २०१७ रोजी काढलेल्या महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग ४ कलम ८९ अन्वये प्रत्येक कॉलेज परीक्षेच्या अखेरच्या दिनांकापासून ३० दिवसांत घोषित करण्याचा प्रयत्न करतील; मात्र कोणत्याही परिस्थितीत हा निकाल उशिरात उशिरा म्हणजे ४५ दिवसांत घोषित करील, असे म्हटले असताना अजूनही निकाल जाहीर नाहीत, यावरून या नियमाची पायमल्ली केली जात आहे असेच दिसते.ज्या विद्यार्थ्यांचे मागील वर्षी काही विषय राहिले होते, ते विषय सोडविण्यासाठी किंवा त्या विषयात पस होण्यासाठी विद्यापीठाने आॅक्टोबर बॅकलॉग ही एक संधी त्यांना उपलब्ध करून दिलेली असते. या परीक्षेला बसून विद्यार्थी आपले मागील वर्षातील विषयात उत्तीर्ण होतात किंवा ते विषय सुटले, असे समजले जाते.कॉलेजच्या निकालाच्या विलंबाबाबत प्राचार्य रामदास रसाळ यांच्याकडे चौकशी केली असता, अजून निकाल लागले नाहीत याला त्यांनी दुजोरा दिला. मात्र, निकाल कधी जाहीर केला जाईल, याची नेमकी तारीख न सांगता लवकरात लवकर तो लावण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार कॉलेजचे शैक्षणिक वर्षाचे प्रथम सत्र १५ जूनला सुरू होणे अपेक्षित असताना ते ९ जुलै रोजी चालू केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांच्या अखत्यारीत येणारी सर्व महाविद्यालये वेळेवर म्हणजे १५ जून २०१८ पासून सुरू करण्याचे व दोन सत्रांतील महाविद्यालयाचे काम ३० एप्रिल २०१९ ला संपवायचे, अशा आशयाचे परिपत्रक २३/०४/२०१८ रोजी काढलेले परिपत्रक क्र. ६७ द्वारे त्यांच्याशी सलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयांना दिले असतानाही उरुळी कांचन येथील पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई महाविद्यालय ९ जुलै २०१८ पासून म्हणजे तब्बल २२ दिवस उशिरा सुरू करून एक प्रकारे विद्यापीठाच्या नियमांची पायमल्लीच केली होती आता निकाल वेळेवर न लावल्याने पुन्हा एकदा तीच री ओढली गेली आहे.

टॅग्स :examपरीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्र