शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

प्रांत कार्यालयाच्या इमारतीची दुरवस्था, नव्या इमारतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 02:29 IST

खेड येथील प्रांत कार्यालयाच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. इमारतीला भेगा पडल्या असून, जीर्ण झालेली इमारत धोकादायक बनली आहे.

दावडी - खेड येथील प्रांत कार्यालयाच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. इमारतीला भेगा पडल्या असून, जीर्ण झालेली इमारत धोकादायक बनली आहे. खेड तालुक्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत असून, ‘प्रांत कार्यालयासाठी नवीन इमारत देता का कोणी?’ असा प्रश्न उपस्थित झाला आहे.फक्त प्रांत अधिकाऱ्यांचेच केबिन हायटेक असून, नागरिकांना मात्र असुविधांचा सामना करावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रांत कार्यालयासाठी नवीन स्वतंत्र इमारत मिळावी, अशी मागणी नागरिक कित्येक वर्षांपासून करीत आहेत.खेड तालुक्यात दिवसेंदिवस रहदारी वाढत आहे. नागरिकांच्या समस्या जटील होत आहेत. खेडप्रांत कार्यालयाला स्वत:ची इमारत नाही. २१ वर्षांपूर्वी प्रांत कार्यालयासाठी भाडेतत्त्वावर खेड तालुका तलाठी संघटनेची वाडारोड येथील इमारत घेण्यातआली. त्यापूर्वी महात्मा गांधी विद्यालयासमोर प्रांत कार्यालय भाड्याने होते.वाडा रोड येथील इमारतीचे भाड्यापोटी दर महिना १८८६ रुपये देण्यात येतात. या कार्यालयात आवक जावक, भूसंपादन, पडीक जमीन परवानगी, पुनर्वसन, फौजदारी, आस्थापना, आरटीएस अपील या कामासाठी नागरिक येतात.- कार्यालयाची दुरवस्था झालेली दिसून येत आहे. कार्यालयातील अनेक भिंतींवरील लाइटच्या वायरही उघड्या आहेत. इमारतीच्या मागील बाजूस कचरा दिसून येत आहे. त्यामुळे स्वच्छता अभियानाचा बोजवारा उडाला आहे.- या कार्यालयातील कर्मचाºयांचे केबिन सुशोभित करून घेतले असले तरी नागरिकांना बसण्यासाठी आवश्यक सुविधा नाहीत. या कार्यालयात खेड तालुक्याच्या कानाकोपºयातून रोज १५०ते २०० नागरिक कामानिमित्त येत असतात. त्यांना बसण्यासाठी जागा सोडाच पिण्याचे पाणीसुद्धा मिळत नाही.- कार्यालयातील कर्मचाºयांनासुद्धा स्वच्छतागृहांची सोय नसल्याने त्यामुळे येथे कार्यरत असलेल्या महिलांची कुचंबणा होते. इमारतीच्या परिसरात कायम दुर्गंधी पसरलेली असते.शासनदरबारी पाठपुरावा- या इमारतीची गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अनेक प्रांताधिकारी आले, बदलून गेले मात्र कोणी शासन दरबारी नवीन कार्यालयासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा केला नाही. इमारतीला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. दारे खिडक्या तुटल्या आहेत. संडास, मुतारीची दुरवस्था झाली आहे. पिण्याच्या पाण्याच्या टाकीची दुरवस्था झाली आहे.- कार्यालयातील अनेक भागात अडगळीचे सामान, अस्वच्छता, विजेच्या उघड्या वायर, नागरिकांसाठी पाण्याची असुविधा अशी परिस्थिती या कार्यालयाची झाली आहे. त्यामुळे फक्त अधिकाºयांचेच केबिन हायटेक होत असून, नागरिकांना मात्र असुविधांचा सामना करावा लागत आहे. 

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या