पुणो : शहरात डेंग्यूचा उद्रेक झाल्याने रुग्णालयात दाखल होणा:या रुग्णांमध्ये प्लेटलेट्सचे प्रमाण झपाटय़ाने घटत आहे. त्यामुळे सर्वच रुग्णालयांमधून प्लेटलेट्सची मागणी वाढली आहे. मात्र दिवाळी सणामुळे रक्तदानाचे प्रमाण शहरात खूपच घटले आहे. त्याचा परिणाम प्लेटलेट्स पुरविण्यावर झाला आहे. अनेक रक्तपेढय़ांमध्ये तर प्लेटलेट्ससाठी वेटिंग लिस्ट लागल्या आहेत.
शहरात डेंग्यूची मोठय़ा प्रमाणात साथ आली आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून प्लेटलेट्सच्या मागणीमध्ये खूप वाढ झाली आहे. रक्तदान शिबिरातून मिळणा:या रक्तामधून प्लेटलेट्स काढून त्या वापरल्या जात आहेत. मात्र दिवाळी सणामुळे शहरात रक्तदान शिबिरांची संख्या खूपच कमी झाली आहे. गेल्या आठवडय़ात तर शहरात शिबिरेच झाली नाहीत.,त्यामुळे रक्तच न मिळाल्याने प्लेटलेट्स काढताच आल्या नाहीत. मात्र शहरात डेंग्यूमुळे प्लेटलेट्सची मागणी वाढतच चालली आहे.
याबाबत आनंदऋषीजी रक्तपेढीचे रामेश्वर यादव म्हणाले, की शहरात डेंग्यूची साथ आल्यामुळे प्लेटलेट्सची मागणी खूप वाढली आहे, तर दुसरीकडे सणांमुळे शहरातील रक्तदानाची शिबिरेच बंद झाली आहेत. रक्तातून प्लेटलेट्स काढल्या जातात. मात्र रक्तच मिळत नसल्याने प्लेटलेट्सही मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्लेटलेट्ससाठी रक्तपेढीमध्ये रुग्णांच्या नातेवाइकांनी रांगा लावल्या आहेत. वेटिंग लिस्टनुसार जसे येईल तसे प्लेटलेट्स दिल्या जात आहेत. गेल्या आठवडय़ात आम्ही एक रक्तदान शिबिर घेतले. त्यातून 7क् पिशव्या प्लेटलेट्स काढण्यात आल्या; मात्र त्या अवघ्या एका तासातच संपल्या.
जनकल्याण रक्तपेढीचे प्रमुख डॉ. अतुल कुलकर्णी म्हणाले,
की डेंग्यूमुळे शहरात प्लेटलेट्सची मागणी खूप वाढली आहे, मात्र गेल्या आठवडय़ात सणामुळे रक्तदान शिबिरांची संख्या खूपच कमी झाली. त्यामुळे प्लेटलेट्सच्या पिशव्यांची संख्या कमी झाली होती. पण मागणीनुसार आम्ही प्लेटलेट्स डोनरला बोलवून रुग्णांना ते देण्याचा प्रयत्न करीत आहोत.(प्रतिनिधी)
प्लेटलेट्स देता येतात महिन्यात चारदा
प्लेटलेट हा रक्तातील एक घटक आहे. रक्तदान न करता रक्तातील प्लेटलेट काढता येऊ शकतात. यासाठी अत्याधुनिक मशिन उपलब्ध आहेत. रक्तदान एकदा केल्यानंतर पुढील 3 महिने ते करता येत नाही. पण फक्त प्लेटलेट दिल्या तर त्या महिन्यातून चार वेळा दान करता येतात. म्हणजेच आठवडय़ातून एकदा प्लेटलेट दान करता येऊ शकतात. शहरातील स्थिती पाहता नागरिकांनी पुढे येऊन प्लेटलेट दान केले पाहिजे, असे आवाहन डॉ. अतुल कुलकर्णी यांनी केले.
प्लेटलेट्सची संख्या या रुग्णांमध्ये होते कमी
प्लेटलेट्सची संख्या काही आजारांच्या रुग्णांमध्येच कमी होते. यामध्ये डेंग्यू प्रथम क्रमांकावर आहे. डेंग्यू झालेल्या रुग्णांच्या रक्तातून प्लेटलेट्सची संख्या झपाटय़ाने कमी होते. त्यापाठोपाठ कर्करोग झालेल्या रुग्णांना किमोथेरपी, रेडिओथेरपी करीत असताना प्लेटलेट्सची संख्या कमी होते. त्यामुळे या दोन्ही प्रकारच्या रुग्णांकडूनच प्लेटलेट्सची सर्वाधिक मागणी असते. त्यापाठोपाठ हृदयाची मोठी शस्त्रक्रिया, प्रसूतीदरम्यान जास्त रक्तस्नव झाल्यास अशा रुग्णांना प्लेटलेट्स द्यावे लागतात.