शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

पक्क्या वाहन परवान्याची प्रतीक्षा होणार कमी      

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 19:41 IST

  ‘आरटीओ’ : कारसाठी फुलेनगर येथील ट्रॅक सोमवारपासून खुला

ठळक मुद्देशिकाऊ व पक्का परवाना घेण्यासाठी सध्या ऑनलाईन पध्दतीने पूर्वनियोजित वेळ घ्यावी लागतेकाही महिन्यांपर्यंत पूर्वनियोजित वेळ घेण्यासाठी लागणारा कालावधी ४ ते ५ महिने

पुणे : कार चालविण्याचा पक्का परवाना मिळण्याचा प्रतीक्षा कालावधी आता किमान १५ दिवसांनी कमी होणार आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा फुलेनगर येथील चाचणी ट्रॅक येत्या सोमवार (दि. १८) पासून खुला करणार आहे. त्यासाठी रविवार सकाळपासून पूर्वनियोजित वेळ घेता येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली. तसेच दुचाकीच्या कोट्यातही वाढ केल्याने वाहनचालकांना परवान्यासाठी अधिक काळ वाट पाहावी लागणार नाही, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.शिकाऊ व पक्का परवाना घेण्यासाठी सध्या ऑनलाईन पध्दतीने पूर्वनियोजित वेळ घ्यावी लागते. मागील काही वर्षांपासून ही प्रक्रिया सुरू केल्याने इच्छुक उमेदवारांच्या वेळेची बचत तसेच आर्थिक लूट थांबली आहे. मात्र, काही महिन्यांपर्यंत पूर्वनियोजित वेळ घेण्यासाठी लागणारा कालावधी ४ ते ५ महिने लागत होता. त्यामुळे या प्रक्रियेबाबत मोठ्या प्रमाणावर नाराजीचा सुर होता. तसेच मोटार प्रशिक्षण संस्थांकडूनही विरोध होऊ लागला होता. पण टप्याटप्याने पूर्वनियोजित वेळेच्या दैनंदिन कोट्यामध्ये वाढ केली. त्यामुळे सध्या प्रतिक्षा कालावधी मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. त्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती शिंदे यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे व संजीव भोर उपस्थित होते.कार चालविण्याच्या पक्क्या परवान्याची चाचणी सध्या भोसरी येथील इन्स्टिट्युट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अ‍ॅन्ड रिसर्च (आयडीटीआर) या संस्थेमधील ट्रॅकवर घेतली जाते. तेथील दैनंदिन कोटा ३२० एवढा आहे. पण ट्रॅकची दैनंदिन चाचणीची क्षमता कमी असल्याने कोटा वाढविणे शक्य नाही. त्यामुळे ‘आरटीओ’ने फुलेनगर येथील जुना ट्रॅक पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. काही वर्षांपूर्वी ‘आयडीटीआर’ येथे चाचणी सुरू केल्यानंतर हा ट्रॅक कारसाठी बंद केला होता. आता प्रतीक्षा कमी करण्यासाठी येत्या सोमवारपासून या ट्रॅकवर चाचणी सुरू केली जाणार आहे. त्यासाठी दैनंदिन कोटा १६० एवढा निश्चित केला आहे. रविवारी (दि. १७) सकाळी आठ वाजल्यापासून पुर्वनियोजित वेळ घेता येईल. या ट्रॅकमुळे प्रतिक्षा कालावधी किमान १५ दिवसांनी कमी होणार असल्याने उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे..........दुचाकीसाठीच्या पक्क्या परवान्याची चाचणी फुलेनगर व आयडीटीआर येथे घेतली जाते. दोन्ही ठिकाणच्या दैनंदिन कोटा आता ४०० पर्यंत वाढविला आहे. तसेच दुचाकी व चारचाकीसाठी एकत्र पूर्वनियोजित वेळ घेतलेल्या उमेदवारांची चाचणी एकाच ठिकाणी होणार घेतली जाणार आहे. त्यासाठीची प्रतीक्षा यादीही कमी होणार आहे. --‘झिरो पेंडन्सी’साठी प्रयत्नवाहन खरेदी केल्यानंतर वाहनमालकांना प्रत्यक्षात नोंदणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी किमान सात दिवसांचा कालावधी लागतो. तसेच वाहन परवान्यासाठीही तेवढेच दिवस थांबावे लागते. सध्या किमान तीन दिवसांत परवाना मिळावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पुढील काळात हा कालावधी एका दिवसावर आणण्यात येईल. शिकाऊ व पक्क्या परवान्यासाठीच्या पुर्वनियोजित वेळेचा प्रतीक्षा कालावधीही एका दिवसावर आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला जाईल.  - अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे विभाग

--शिकाऊ व पक्क्या परवान्याच्या पूर्वनियोजित कोट्याची स्थिती                                 दि. १ जूनपर्यंत        सध्याशिकाऊ                         ३००                       ६००पक्का परवानादुचाकी (गिअर)              २००                     ४००कार                              १०८                       ४८०कार (टुरिस्ट)                १६                         ८० 

टॅग्स :PuneपुणेRto officeआरटीओ ऑफीस