शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

वाघजाईनगर येथील मारहाणीतील इसमाचा रुग्णालयात मृत्यू, तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 20:44 IST

खराबवाडी ( ता. खेड) येथील वाघजाईनगरमधील विंडाल्स प्रोसिजन कंपनीच्या समोर दारूच्या नशेत दगडांनी मारहाण करण्यात आलेल्या एका इसमाचा पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

चाकण : खराबवाडी ( ता. खेड) येथील वाघजाईनगरमधील विंडाल्स प्रोसिजन कंपनीच्या समोर दारूच्या नशेत दगडांनी मारहाण करण्यात आलेल्या एका इसमाचा पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, या प्रकरणी मंगळवारी तीन संशयित आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांनाही अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माणिक नारायणराव मगनाळे ( वय ४५, रा. राजगुरूनगर, ता. खेड, जि. पुणे ) असे गंभीर मारहाणीत मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. या प्रकरणी किरण शिवाजी जाधव ( वय २६, सध्या रा. खराबवाडी, ता. खेड, मूळ रा. दावडी, ता. खेड, जि. पुणे), कृष्णा मारुती दणगे ( वय १९, सध्या रा. खराबवाडी, ता. खेड, मूळ रा. मुखेड, जि. नांदेड ) व शशिकांत राजाराम आतकर (वय २५, सध्या रा. चिंबळीफाटा, ता. खेड, मूळ रा. येनवे, ता. खेड, जि.पुणे ) या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करून चाकण पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.कंपनीचे सुरक्षारक्षक भाऊसाहेब फूजा गुंजाळ ( वय ३८ वर्षे, रा. चाकण ता. खेड जि. पुणे ) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रदीप पवार, पोलीस हवालदार सुभाष पवार, विठ्ठल कुंभार, अमोल जाधव, शेखर कुलकर्णी, संदीप रावते, होमगार्ड चिंतन गारगोटे यांच्या पथकाने तपास करून आरोपींवर गुन्हा दाखल केला.याबाबतची अधिक माहिती अशी की, बुधवार ७ फेब्रुवारी रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास वाघजाईनगर येथील विंडाल्स प्रोसिजन कंपनीसमोरील रस्त्यावर वरील आरोपी दारू पिऊन पडले होते. यावेळी प्रेम रोडलाइन्समध्ये वाहनचालकाचे काम करणारे मृत माणिक मगनाळे हे रस्त्यावरून जाताना पिलेल्या तिघांना ''पिये है भोसडी के'' असे म्हणाल्याने त्यांच्यात भांडण जुंपले.यावेळी राग आलेल्या तिघांनी मगनाळे यांना दगड, लोखंडी पाईप व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यानंतर त्यांना पिंपरीच्या वाय सी एम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आरोपींवर ७ तारखेला भादंवि कलम ३२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपचारादरम्यान मगनाळे यांचा मृत्यू झाल्याने आज चाकण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Arrestअटक