लोकमत न्यूज नेटवर्कवाघोली : दोन तरुणांच्या सतर्कतेमुळे वाघोली येथील बाएफ रस्त्यावर मानवी वस्तीत आलेल्या बेबी कोब्राला जीवदान देण्यात यश आले आहे. सर्पमित्रांच्या मदतीने बेबी कोब्राला लोहगाव येथील फॉरेस्ट पार्कमध्ये सोडून देण्यात आले.याबाबतची माहिती अशी : वाघोली येथील बाएफ रस्त्यावरील सवाना सोसायटीच्या अलीकडे मुख्य रस्त्यावर सापाचे पिलू चालले असल्याचे स्थानिक तरुण ओंकार तुपे व सचिन जगताप यांना दिसले. या सापाला सुरक्षित पकडण्यासाठी दोघांनी प्रयत्न केला. तत्काळ वनअधिकारी गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्यात आला. जवळच असलेले सर्पमित्र सुरेश लोहिरे, रवी लोहिरे यांच्या सहकार्याने सापाच्या पिलाला लोहगाव फॉरेस्ट पार्क येथे सुरक्षित ठिकाणी सोडून देण्यात आले.
वाघोलीत बेबी कोब्राला जीवदान
By admin | Updated: June 30, 2017 04:10 IST