शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

वाघोली-शिक्रापूर मार्ग होणार सहापदरी, २६ किलोमीटरसाठी २२२.२४ कोटी रुपये मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 00:20 IST

राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हायब्रिड अ‍ॅम्युनिटीअंतर्गत पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाघोली ते शिक्रापूर या २६ किलोमीटर मार्गाच्या सहापदरीकरणाला मान्यता दिली आहे.

कोरेगाव भीमा  - राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हायब्रिड अ‍ॅम्युनिटीअंतर्गत पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाघोली ते शिक्रापूर या २६ किलोमीटर मार्गाच्या सहापदरीकरणाला मान्यता दिली आहे. यामुळे महामार्गावरील प्रवाशांसह औद्योगिक कारखान्यांतील कामगारांची वाहतूककोंडीतून येत्या काळात सुटका होणार आहे.यासाठी राज्य सरकारने हायब्रिड अ‍ॅन्युईनिटीअंतर्गत सहापदरीसाठी सुमारे २२२.२४ कोटी रुपयेही मंजूर केले. परंतु, या कामासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक होते. पाचर्णे व शिरूर बाजार समितीचे संचालक राहुल गवारे यांच्या पाठपुराव्यानंतरदेखील मिळाले. अखेर १७ सप्टेंबर २०१८ ला राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने या रस्त्यावर हायब्रिड अ‍ॅन्युईटीअंतर्गत रस्त्याचे काम करण्यास राज्य सरकारला परवानगी दिली. ‘या रस्त्याच्या सहापदरीकरणाचा मार्ग आता मोकळा झाला असून त्या कामाची निविदा प्रक्रियाही येत्या ८-१० दिवसांत सुरू होणार आहे,’ असे राहुल गवारे यांनी सांगितले.सहापदरीकरणाच्या या कामामुळे पुणे-शिरूर रस्त्याच्या वाहतूककोडींचा प्रश्नही आता सुटणार आहे. औद्योगिक परिसरात काम करणारे कर्मचारी आणि व लांब पल्ल्याच्या प्रवाशांनाही याचा फायदा मिळणार आहे.अशी फुटली निर्णयाची कोंडी...ही वाहतूककोंडी सुटावी, यासाठी शिरूरचे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी पाठपुरावा केला. याबाबत माहिती देताना ते म्हणाले, ‘‘राज्य सरकारने हायब्रिड अ‍ॅम्युनिटीअंतर्गत १६ नोव्हेंबर २०१६ रोजी पुणे ते शिरूर या ५२ किलोमीटरच्या रस्त्यासाठी ४६२ कोटी रुपये मंजूर केले. या कामासाठी २८ जून २०१७ रोजीच्या आदेशानुसार सी. व्ही. कांड कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड यांची प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर या प्रकल्पाची किंमत वाढून तो ७८३ कोटींचा झाला. याबाबतचा प्रकल्प अहवाल सार्वजनिक बांधकाम खात्यांच्या कार्यकारी अभियंत्यांना सादरही करण्यात आला. त्यामध्ये वाघोली, शिक्रापूर, रांजणगाव अशा अनेक ठिकाणी उड्डाणपुलाची तरतूद होती. मात्र, ३ जानेवारी २०१७ ला हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आला. यामुळे राज्य सरकारने पुणे-शिरूर रस्त्याचे काम रद्द केले. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कामास विलंब लागणार असून त्यामुळे परिसरातील वाहतुकीचा प्रश्न चिघळणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकात पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. अखेर पाटील यांनी या मार्गाचे सहापदरीकरण करण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या