शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वाघजाई नगरचा कचरा डेपो हलवला नाही, तर ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2018 19:22 IST

खराबवाडी गावच्या हद्दीतील वाघजाईनगर येथील दगड खाणीतील कचरा डेपो त्वरित हलविला नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वाघजाईनगर व खराबवाडीच्या ग्रामस्थांनी दिला आहे.

चाकण : खराबवाडी गावच्या हद्दीतील वाघजाईनगर येथील दगड खाणीतील कचरा डेपो त्वरित हलविला नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वाघजाईनगर व खराबवाडीच्या ग्रामस्थांनी दिला आहे. येथील डेपो हलविण्यासाठी येथील ग्रामस्थ व खराबवाडी ग्रामपंचायतने अनेकदा तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.गेल्या नऊ वर्षांपासून वाघजाईनगर येथे परिसरातील ग्रामपंचायती व चाकण एमआयडीसीतील औद्योगिक कंपन्या बेकायदेशीरपणे कचरा टाकीत आहेत. येथील ग्रामपंचायत, वाघजाईनगर व खराबवाडीचे ग्रामस्थ यांनी अनेकदा कचऱ्याच्या गाड्या अडविल्या, आंदोलने केली व शासकीय अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदने दिली, पण प्रत्यक्ष कारवाई किंवा अंमलबजावणी न करता फक्तच आश्वासने मिळत गेली.हा कचरा डेपो हलविण्यासाठी १८ ऑक्टोबर २०१२ रोजी तहसील कार्यालयासमोर खराबवाडीचे माजी उपसरपंच बाळासाहेब शिळवणे व ग्रा. पं. सदस्य राहुल शेलार यांच्यासह ग्रामस्थांनी उपोषण केले होते, ग्रामस्थांनी तर त्यावेळी तहसील कार्यालयासमोर भजन करून आंदोलन छेडले होते.त्यावेळी तहसीलदारांनी हा प्रश्न ३ महिन्यात मार्गी लावतो असे आश्वासन दिले होते; परंतु हा प्रश्न मार्गी तर लागलाच नाही उलट कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यामुळे परिसरातील कंपनीच्या कामगार व नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. खाणीत पाणी साचून दुर्गंधी सुटली आहे. खाणीत पाणी असूनही वापरता येत नाही, हे पाणी जनावरे पीत असल्याने जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील दुर्गंधी व केमिकलयुक्त पाणी जमिनीत झिरपून आजूबाजूच्या बोअरवेल व विहिरींमध्ये उतरून पिण्याचे पाणी दुषित झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये विविध आजार निर्माण झाले आहेत. हवा दूषित झाली आहे. हा कचरा डेपो त्वरित हलविला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष शिळवणे, सरपंच सागर खराबी, उपसरपंच रोहिदास शिळवणे, माजी उपसरपंच बाळासाहेब शिळवणे, उद्योजक तुकाराम शिळवणे, जीवन खराबी, शाखा प्रमुख पांडुरंग शिळवणे, सर्व ग्र.पं. सदस्य व ग्रामस्थांनी दिला आहे.